breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महिलांच्या सक्षमीकरणासाठी महापालिकेचा ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पंडीत दिनदयाल उपाध्याय महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम या योजनेअंतर्गत वस्तीपातळीवर 21 विषयांचे मार्गदर्शन व प्रशिक्षण दिले जाणार आहे. हा कार्यक्रम राबविण्यासाठी प्रत्यक्ष होणा-या खर्चास स्थायी समितीने बुधवारी (दि. 5) सभेत आयत्यावेळी मान्यता देण्यात आली

सभापती विलास मडिगेरी यांच्या अध्यक्षतेखाली स्थायी समितीची बैठक पार पडली. या योजनेंतर्गत 31 मार्च 2020 ते 31 मार्च 2021 अखेरपर्यंतच्या कालावधीपर्यंत प्रशिक्षणाचे काम हे अखिल भारतीय स्थानिक स्वराज्य संस्थेमार्फत थेट पद्धतीने केले जाणार आहे. योजनेच्या धोरणास आणि प्रत्यक्ष होणा-या खर्चास स्थायी समितीने आयत्यावेळी मान्यता दिली. दरम्यान, योजनेवरील खर्च गुलदस्यात ठेवण्यात आला आहे. राष्ट्रवादी, शिवसेना आणि सत्ताधारी भाजपच्या एका नगरसेवकाचा प्रचंड विरोध होत असताना हा विषय मंजूर केला आहे.

मुलींच्या ज्ञानात व कौशाल्यात वाढ व्हावी. व्यवसाय करुन त्यांचे आर्थिक उत्पन्न वाढावे, विविध व्यवसाय कलांमध्ये महिलांनी पारंगत होऊन त्यांचे दैनंदिन जीवनात ते उपयुक्त ठरावे. या महिला सक्षमीकरणाच्या, सबलीकरणाच्या दृष्टीने महिलांसाठी कौशल्य वाढ कार्यक्रमाअंतर्गत विविध व्यवयाय पूरक प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात येते. पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या नागरवस्ती विकास योजना विभागाकडील महिला व बालकल्याण विभागामार्फत ‘पंडीत दिनदयाल उपाध्याय – महिलांसाठी ज्ञान कौशल्य वाढ कार्यक्रम’ योजना राबविण्यात येणार आहे.

वस्तीपातळीवर दिले जाणार प्रशिक्षण

या योजनेअंतर्गत वस्तीपातळीवर इंटेडिअर डिझाईन, डेकोरेशन प्रशिक्षण, हेअर स्पा, म्युरल पेटींग प्रशिक्षण, समासा आर्ट प्रशिक्षण, इन्टंट फुड प्रशिक्षण, विमा सल्लागार प्रशिक्षण अशा 21 विषयांचे प्रशिक्षण देण्यात येणार आहे. महापालिकेच्या आयटीआयमार्फत विविध व्यवसायांचे प्रशिक्षण देण्याचे काम चालते. तथापि, वस्तीपातळीवरील प्रशिक्षण देण्यासाठी तयारी करणे, प्रशिक्षण निहाय आवश्यक साधन सामग्री उपलब्ध करणे, प्रशिक्षक, प्रशिक्षीकांची नेमणूक करणे, आवश्यक मनुष्यबळाची नेमणूक, मानधन ठरविणे या कामाच्या व्यापाचा विचार करता या योजनेची अंमलबजावणी आयटीआयमार्फत तातडीने होणे शक्य नसल्याचा दावा केला आहे. त्यानुसार तातडीने योजना सुरु होण्यासाठी आणि निविदा पद्धतीने संस्था निवडीसाठी प्रदीर्घ कालाधीचा लागणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button