breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटलांची भविष्यवाणी; डिसेंबरमध्ये होणार मुदतपुर्व निवडणूक

पुणे |महाईन्यूज|

राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार टिकले नाही तर डिसेंबर महिन्याच्या आसपास मुदतपूर्व निवडणूक होईल, असे भाकित भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी बुधवारी वर्तवले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत भाजपने विश्वासघात केला असल्याचा आरोप केला. त्या बाबत पाटील म्हणाले, ‘कोणी कोणाचा विश्वासघात केला आहे, हे जनतेला कळाले आहे. हे सरकार चालले नाही आणि डिसेंबरच्या आसपास मध्यवर्ती निवडणूक लागली तर कोणी विश्वासघात केला, हे जनताच ठरवेल.’

पुणे महापालिकेत झालेल्या पत्रकार परिषदेत पाटील यांनी मुदतपूर्व निवडणुकीचा मुद्दा छेडला. मात्र, या बाबत अधिक विचारले असता असता त्यांनी सारवासारव केली. ‘हे सरकार चालले नाही तर भाजपने कोणाबरोबर सरकार स्थापन करावे, असा प्रश्न आहे, त्यामुळे सरकार पडले तर राज्यात डिसेंबरच्या आसपास मुदतपूर्व निवडणूक होईल,’ असा दावाही पाटील यांनी केला. या प्रसंगी महापौर मुरलीधर मोहोळ, उपमहापौर सरस्वती शेंडगे, स्थायी समितीचे अध्यक्ष हेमंत रासने, सभागृह नेते धीरज घाटे आदी उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button