breaking-newsTOP Newsमहाराष्ट्रमुंबई

अंधश्रध्देतून अंगावर हळद-चंदनाचा लेप लाऊन मायलेकाची केली हत्त्या

मुंबई – अंगात भूत शिरल्याच्या संशयावरून लाकडी दांडक्याने बेदम मारहाण करत मायलेकाला जीवे ठार मारल्याची घटना कल्याण येथील खडकपाडा परिसरात घडली. यामागे अंधश्रध्दा असून यामुळेच अटाळी येथे मायलेकाचा बळी दिल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. याप्रकरणी खडकपाडा पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी अघोरी बाबासह चार आरोपींना ताब्यात घेतले आहे. आरोपींमध्ये एका अल्पवयीन मुलाचा समावेश आहे.

पंढरीनाथ शिवराम तरे (वय 50) आणि चंदूबाई शिवराम तरे (वय 76) अशी मृतांची नावं आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मायलेकाच्या अंगात भूत येत असल्याच्या संशयावरून दोघांना नातेवाईकांनी अटाळी येथील अघोरी बाबाकडे नेलं होतं. अघोरी बाबाच्या सांगण्यावरून नातेवाईकांनीच मायलेकांना भूत उतरवण्याच्या नावाखाली लाकडी दांडक्यानं बेदम मारहाण केली. त्यात दोघांचा मृत्यू झाला. खडकपाडा पोलीस ठाणे हद्दीत शनिवारी रात्री ही धक्कादायक घटना घडली. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत मिळालेली माहिती अशी की, अटाळी येथील गणेश नगरमधील भोईर कंपाऊंड परिससरातील सद्गुरू माऊली कृपा सदन येथे हा धक्कादायक प्रकार घडला. अघोरी बाबा सुरेंद्र पाटील यांच्या सांगण्यावरून  विनायक कैलास तरे, कविता कैलास तरे आणि त्यांच्या अल्पवयीन मुलानं लाकडी दांडक्यानं पंढरीनाथ तरे आणि चंदूबाई तरे यांच्या अंगाला हळद लावून बेदम मारहाण करून ठार मारलं.

आरोपींमध्ये मृत पंढरीनाथ तरे यांचा एक भाऊ, पुतणे, वहिनी आणि अघोरी बाबाचा समावेश आहे. पोलिसांनी चौघांना ताब्यात घेतलं आहे. पोलीस पुढील तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button