breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महाराष्ट्र मजदूर संघटनेतर्फे 500 जणांची आरोग्य तपासणी 

पिंपरी –  महाराष्ट्र मजदूर संघटना व पवना हॉस्पीटल यांच्या संयुक्त विद्यमानाने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य व बालरोग तपासणी शिबिराला मावळातील नागरिकांचा मोठा प्रतिसाद मिळाला. यामध्ये 500 जणांची आरोग्य तपासणी करण्यात आली.

उर्से येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत शनिवारी (दि.30 जून) रोजी हे शिबिर पार पडले. यावेळी महाराष्ट्र मजदूर संघटनेचे महा संघटक, उर्से गावचे माजी सरपंच व विद्यमान ग्रामपंचायत सदस्य प्रदीप धामणकर, मकरंद ढम, यशवंत ठाकूर, माउली राऊत, वामण धामणकर, बंडूपंती धामणकर, उत्तम गायकवाड, बाबूलाल सय्यद, राजू पठाण, बाळासाहेब धामणकर, जयसिंग ठाकूर आदी उपस्थित होते.

या शिबिरात हृदयरोग शस्त्रक्रिया, किडनी, मणक्याचे आजार, दंतरोग, नेत्ररोग, बालरोग व शस्त्रक्रिया, रक्तदाब, स्त्रिरोग, हिमोग्लोबीन अशा आजारांची तपासणी करण्यात आली. तसेच मोफत औषधांचे वाटप करण्यात आले. या शिबिराचा 500 महिला व नागरिकांनी लाभ घेतला. पवना हॉस्पीटलचे डॉ. निपुण जाधव, डॉ. प्रमोद निकम, डॉ. संदीप चव्हाण, डॉ. सोनल विस्पुते यांनी रुग्णांची तपासणी केली.

यावेळी प्रदिप धामणकर म्हणाले, ”शहरातील नागरिकांपेक्षा ग्रामीण भागातील सर्वच नागरिक अधिक परिश्रम करतात. परंतु, परिश्रम करताना ते आपल्या आरोग्याची निगा राखण्याकडे दुर्लक्ष करतात. पावसाळा सुरु झाला की साथीचे रोग मोठ्या प्रमाणात आढळतात. या दरम्यान आरोग्याची अधिक काळजी घेणे गरजेचे आहे. मावळ परिसरातील महिला घर संसार, मुलांचे शिक्षण व शेती पुरक व्यवसाय करतात. यात त्या अतिशय मग्न असतात. हे सर्व करत असताना महिलांकडून आजारांकडे दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे झालेला आजार गंभीर स्वरुप घेतो आणि जमावलेली पूंजी कधी खर्चिक होते. हे देखील लक्षात येत नाही. त्यामुळे वेळीच डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक असते. तसेच नागरिकांनी शरीर हीच संपत्ती याबाबत देखील त्यांनी मार्गदर्शन केले”.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button