breaking-newsताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४७ हजार ७४१वर

मुंबई | महाराष्ट्रात गुरुवारी कोरोनाचे तब्बल ४ हजार ८४१ नवे रुग्ण आढळले. तर १९२ कोरोना रुग्णांनी आपला जीव गमावला. यासह राज्यातील एकूण कोरोनाबाधितांची संख्या १ लाख ४७ हजार ७४१वर पोहोचली असून कोरोनाबळींचा आकडा ६ हजार ९३१ इतका झाला आहे. ही वाढती संख्या प्रशासनासह सर्वसामान्यांची चिंता वाढविणारी आहे.

देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत काल दिवसभरात १ हजार ३६५ नव्या रुग्णांची नोंद झाली. तर ५८ कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मुंबईतील एकूण कोरोनाबाधितांचा आकडा ७० हजार ९९०वर पोहोचला असून कोरोनाबळींची संख्या ४ हजार ६० इतकी झाली आहे. मुंबईपाठोपाठ पुण्यातील कोरोना परिस्थिती दिवसेंदिवस चिंताजनक होतेय. पुणे शहरात काल दिवसभरात ५३१ नवे कोरोना रुग्ण आढळले. यासह शहरातील एकूण कोरोना रुग्णांची संख्या १४ हजार १८५ इतकी झाली आहे. तर दिवसभरात १३ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाल्याने कोरोनाबळींचा आकडा ५५८वर पोहोचला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button