breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महेश लांडगे यांचा उमेदवारी अर्ज दाखल, पदयात्रेला प्रचंड प्रतिसाद (पहा Video)

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भोसरीचे आमदार महेश लांडगे यांनी आज जोरदार शक्तीप्रदर्शन करत भोसरी गावठाणातून पदयात्रा काढली. विक्रमी नोंद करावी अशी ही पदयात्रा होती. यामध्ये भोसरी गावातील सर्वांचाच महेश लांडगे यांना पाठिंबा मिळत असताना पहायला मिळाले. आज त्यांनी मोठ्या उत्साहात त्यांच्या सहका-यांच्या उपस्थितीत भाजपकडून आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

यावेळी खासदार गिरीश बापट, खासदार अमर साबळे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर राहुल जाधव, प्राधिकरण अध्यक्ष सदाशिव खाडे, भाजप नेत्या उमा खापरे, सभागृह नेता एकनाथ पवार, माजी महापौर नितीन काळजे, पिंपरी-चिंचवड मनपा स्थायी समितीचे सभापती विलास माडिगेरी, बाळासाहेब गव्हाणे आदी प्रमुख उपस्थित होते.

महेश लांडगे हे 2014 च्या विधानसभा निवडणुकीत भोसरी मतदार संघातून अपक्ष निवडून आले होते. त्यांच्या नावाची आजही मोठी क्रेज निर्माण झालेली आहे. लोकांचा जनसंपर्क आणि जनतेची सेवा करण्याची दृढ भावना मनात असल्यामुळे यावेळी त्यांना भारतीय जनता पक्षाने उमेदवारी दिली. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी आज त्यांनी भोसरी गावठाण, पीएमटी चौक, दिघी रोड, टिंगरे पेट्रेल पंप ते गावजत्रा मैदान या मार्गाने पदयात्रा काढून लोकांचे आशिर्वाद घेतले.

या मार्गाने त्यांनी भव्य पदयात्रा काढली. पदयात्रेत त्यांना मानणा-या वर्गाने मोठी गर्दी केली होती. भैरवनाथाचे दर्शन घेऊन छत्रपती शिवाजी महाराज यांना पुष्पहार घालण्यात आला. त्यानंतर त्यांनी पुढे दिघी रोडच्या नागरिकांच्या भेटीगाठी घेतल्या. आज दुपारी त्यांनी मोठ्या उत्साहात कार्यकर्त्यांच्या उपस्थितीमध्ये आपला उमेदवारी अर्ज दाखल केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button