breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

Solar Project : सोलर प्रकल्पामुळे ५० टक्के वीज बचत होणार!

पुनावळेतील माय होम कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीचा उपक्रम

पिंपरी : पुनावळेतील माय होम कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीच्या पुढाकाराने बसविलेल्या ६० किलोवॅटच्या सोलर प्रकल्पामुळे तब्बल ५० टक्के वीज बिल बचत होणार आहे. तसेच सोसायटीचे सुमारे १ लाख रुपयांची विजेची बचत होणार आहे. नुकतेच या सोलर प्रकल्पाचे उदघाटन करण्यात आले. खासगी सोलर ऑपरेटिंग एजन्सी सोबत दहा वर्षासाठी करार करून या कंपन्यांमार्फत देखभाल दुरुस्ती केली जाणार आहे.

नवनाथ ढवळे, डायरेक्टर अधिरा इंटरनॅशनल स्कूल पुनावळे यांच्या हस्ते पूजा करून या प्रकल्पाचे उद्घाटन करण्यात आलेले आहे. या वेळी समितीतर्फे चेअरमन मधुर तनेजा, सेक्रेटरी व कोषाध्यक्ष अतुल माळोदे, नीरज पाटील, जयंत मोरे, रुपेश कोल्हे, कपाडिया आदी मान्यवर उपस्थित होते. सोसायटी व्यवस्थापकीय समिती व सोसायटीमधील रहिवासी उपस्थित होते.

हेही वाचा – ‘सावरकरांबद्दल अपानजनक बोलाल तर महाराष्ट्रात फिरु देणार नाही’; मनसेचा राहुल गांधींना इशारा

माय होम कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी, पुनावळे मध्ये १२ मार्च २०२४ रोजी ६० किलोवॅटचा सोलर प्रकल्प कार्यान्वित झालेला आहे. यामध्ये सुमारे साडेसात हजार युनिट प्रति महा उत्पन्न होईल, अशी माहिती सभासदांनी दिली. त्यामध्ये जवळपास ४० ते ५० टक्के वीजबिलाची बचत सोसायटीला अपेक्षित आहे. सोसायटीला दीड ते पावणे दोन लाख रुपये दरमहा बिल येत आहे. पुढील काळात सोसायटी वीज बिल हे मोठ्या प्रमाणात कमी होईल. तसेच हा प्रकल्प आरे एजन्सीतर्फे इन्वेस्टमेंट करून सोसायटीला योग्य दरात वीज देण्यात येणार आहे. हा करार सोसायटीने सोलर ऑपरेटिंग एजन्सी सोबत दहा वर्षासाठी केला आहे. या प्रकल्पासाठी लागणारा खर्च हा पूर्णपणे इन्वेस्टर तर्फे करण्यात आलेला आहे. तसेच सोसायटी सभासदाकडून कोणताही अतिरिक्त अधिभार न लावता हा प्रकल्प कार्यान्वीत करण्यात आलेला आहे.

वीज बचतीसाठी सोसायटीचा स्तुत्य उपक्रम –

सोलर प्रकल्प उभारून वीज निर्मिती करण्याबाबत शासन, सामाजिक संस्था जनजागृती करत आहेत. काही नागरिक हे प्रकल्प उभे देखील करत आहेत. मात्र याची संख्या कमी आहे. पुनावळेतील माय होम कॉ-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटीने हा प्रकल्प उभारून इतर सोसायट्यांना वीज बचतीचा आणि वीज निर्मितीचा योग्य संदेश दिला आहे. सोसायटीचा स्तुत्य उपक्रम इतरही जणांना अवलंबता येऊ शकतो.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button