breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात गेल्या 48 तासात 222 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण, तर 3 जणांचा मृत्यू

महाराष्ट्रात सर्वात जास्त करोना रुग्ण आढळून येत आहेत. त्यात पोलिसांमध्येही कोरोनाबाधितांचं प्रमाण तेवढचं वाढत चाललं आहे. गेल्या 48 तासात 222 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोना विषाणूची लागण झाली असून 3 जणांचा मृत्यू झाला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील कोरोनाबाधित पोलिस कर्मचाऱ्यांची संख्या 5,935 वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत 74 पोलिस कर्मचाऱ्यांना कोरोनामुळे जीव गमवावा लागला आहे. याशिवाय 4,715 पोलिसांनी कोरोनावर यशस्वी मात केली आहे.

महाराष्ट्रात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण पसरत आहे. ग्रामीण भागांपेक्षा शहरी भागात कोरोना बाधित रुग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात आढळून येत आहे.

कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर राज्यातील डॉक्टर्स, पोलिस कर्मचारी, वैद्यकिय कर्मचारी, पत्रकार आदी आपल्या जीवाची बाजी लावत आपलं कर्तव्य पार पाडत आहेत. परंतु, यातील अनेक कोरोना योद्ध्यांना कोरोना विषाणूची लागण झाली आहे. यात हजारो पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेश आहे

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button