breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महाराष्ट्रात कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण पाॅझिटिव्ह नाही – आरोग्यमंत्री राजेश टोपे

मुंबई – कोरोना व्हायरसचा एकही रुग्ण पॉझिटिव्ह नसल्याची माहिती सार्वजनिक आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. आतापर्यंत सर्वच विमानतळावर 1 लाख 18 हजार 267 प्रवाशांची स्क्रिनिंग तपासणी करण्यात आली आहे.

आरोग्यमंत्री राजेश टोपे म्हणाले, “आत्तापर्यंत 1 लाख 18 हजार 267 लोकांची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 280 लोकांना याची लक्षणं आढळली. त्या आधारे या सर्वांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. प्रत्येकाच्या दोन स्तरावरील चाचण्या घेण्यात आल्या. यापैकी 273 जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत, तर 7 जणांच्या चाचण्यांचा अहवाल येणे अद्याप बाकी आहे.

महाराष्ट्रात एकूण 8 लोक वेगवेगळ्या शहरांमध्ये रुग्णालयात दाखल आहेत. यात मुंबईच्या कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये 3, ठाणे येथील हिरानंदानी हॉस्पिटलमध्ये 1, नागपूरच्या आयजीएमसीमध्ये 1, पुण्यातील नायडू हॉस्पिटलमध्ये 3 यांचा समावेश आहे. जालना जिल्ह्यात 119 स्वतंत्र खाटा, महानगरपालिकेत 97, मेडिकल कॉलेजमध्ये 266, खासगी हॉस्पिटलमध्ये 20 असे एकूण 502 आयसोलेशन बेड तयार करण्यात आले आहेत.

गरज असेल तेव्हा तात्काळ व्हेंटिलेटर उपलब्ध व्हावेत म्हणून 82 व्हेंटिलेटर वेगळे काढून ठेवण्यात आले आहेत. 9 हजार 801 प्रायव्हेट प्रोटेक्शन किट, 2 लाख एन 95 स्पेशल मास्क उपलब्ध आहेत. तसेच पेशंट आणि नातेवाईकांसह अन्य लोकांनी वापरता यावेत यासाठी ट्रिपल लेअर 15 लाख मास्क उपलब्ध करुन ठेवण्यात आले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button