breaking-newsताज्या घडामोडीपुणे

गाव यात्रांवरही कोरानाचे सावट, अजित पवारांनी दिले संकेत

बारामती – कोरोना वाढता प्रादुर्भाव रोखण्यासंदर्भातील जागरुकतेच्या पार्श्वभूमीवर राज्याचे उप मुख्यमंत्री अजित पवार यांनी एक खास संदेश दिला आहे. बारामतीमध्ये विविध ठिकाणी झालेल्या कार्यक्रमात त्यांनी हस्तांदोलन टाळून लांबून  नमस्कार करणे पसंत केले. कार्यक्रमातील भाषणावेळी त्यांनी यासंदर्भातील स्पष्टीकरण दिले. अजित पवार म्हणाले की, सद्यपरिस्थितीला सर्वत्र कोरोनाचे सावट आहे. डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार हस्तांदोलन करण्यापेक्षा सध्या मी प्रत्येकाला नमस्कार करत आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव कमी होत नाही तोपर्यंत हस्तांदोलन करणे टाळा, असा संदेश त्यांनी उपस्थितांना दिला.  

बारामतीमध्ये झालेल्या एका कार्यक्रमातील भाषणात त्यांनी कोरोनाच्या मुद्यावर अधिक भर दिला. सरकारने गर्दीच्या ठिकाणी न जाण्याच्या सूचना काढल्या आहेत. एवढेच नाही तर गावांत भरवण्यात येणाऱ्या यात्रा आणि जत्रांवरही अंकूश आणा. त्या होऊ देऊ नका यासंदर्भात राज्य सरकार विचार करत आहे, असे ते म्हणाले. गावातील यात्रा आणि जत्रेच्यावेळी मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. ही गोष्ट लक्षात ठेवून राज्य सरकार एखादी सूचना काढू शकते, असे संकेतच अजित पवारांनी यावेळी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button