breaking-newsताज्या घडामोडीपुणेराजकारण

महाराष्ट्राच्या चित्ररथास परवानगी नाकारणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध – खा. सुप्रिया सुळे

पुणे | महाईन्यूज | प्रतिनिधी

प्रजासत्ताक दिनानिमित्तच्या संचलनात महाराष्ट्र व पश्चिम बंगालच्या चित्ररथास केंद्र सरकारने परवानगी नाकारली. हा देशाचा उत्सव असून केंद्र सरकारने सर्व राज्यांना प्रतिनिधित्व देणे अपेक्षित आहे. परंतु सरकार आकसाने वागत असून विरोधकांची सत्ता असणाऱ्या राज्यांना सापत्नभावाची वागणूक देतेय, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी सरकारवर टीका केली आहे.

महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या दोन्ही राज्यांनी देशाच्या स्वातंत्र्यलढ्यात मोलाची भूमिका बजावली आहे. या राज्यांना परवानगी नाकारण्याची कृती हा येथील जनतेचा अपमान आहे. केंद्र सरकारच्या या कृतीचा जाहीर निषेध करत असल्याचेही सुळे यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, प्रजासत्ताक दिनानिमित्त संचलनात महाराष्ट्राचा चित्ररथास मोदी सरकारने परवानगी नाकारली त्या विरोधात आज राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय ठाणे येथे केंद्र सरकारच्या विरोधात निषेध व्यक्त करण्यात आला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button