breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

तुळजापूर येथे मराठवाडा विभागीय स्पर्धेचा पारितोषिक सोहळा थाटात संपन्न

तुळजापूर | महाईन्यूज| प्रतिनिधी

स्वातंत्र्यसेनानी भानुदास जयवंतराव धुरगुडे यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त तुळजापूर येथे मराठवाडा विभागीय विविध स्पर्धाचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धांचे बक्षीस वितरण समारंभ तुळजापूर पंचायत समितीच्या प्रांगणात भव्य बक्षीस वितरण समारंभ संपन्न झाला.

यावेळी प्राचार्य अनिरुद्ध जाधव प्राचार्य डॉ. एस. एम. मनेर, जिल्हा क्रीडाधिकारी भाग्यश्री बिले, सन अँड ओशन ग्रुपचे राजकुमार धुरगुडे, जि. प. सदस्य महेंद्र धुरगुडे,शैलेश धुरगुडे, कवयित्री अलका धुरगुडे, मातोश्री विमलबाई धुरगुडे, दत्ताजी म्हेत्रे, हेमकांत महामुनी यांची उपस्थिती होती.

त्यावेळी कवयत्री अलका राजकुमार धुरगुडे लिखित “मनतरंग”, राजकुमार धुरगुडे लिखित “वास्तवरंग” आणि हेमकांत महामनी लिखित “आप्पा स्वातंत्र्यसेनानी भानुदास जयवंतराव धुरगुडे” या तीन पुस्तकांचे प्राचार्य डॉ. अनिरुद्ध जाधव यांच्या व मान्यवरांच्या उपस्थितीत प्रकाशन करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन भैरवनाथ कानडे यांनी केले.तर आभार शैलेश धुरगुडे यांनी मानले.

यंदाच्या पुरस्काराचे मानकरी

मराठवाडा भूषण आदर्श शिक्षक पुरस्काराचे मान्यवरांच्या उपस्थितीत वितरण करण्यात आले,यावेळी देविदास श्रीनिवास पांचाळ, श्रीमती अनिता मारोती खडके (भादा) शांताबाई रतनभाऊ झपाटे, कुमार मारुती बिरदवडे,चंद्रकांत दिगंबर कांबळे हे यंदाचा पुरस्काराचे मानकरी ठरले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button