breaking-newsआंतरराष्टीय

महाराणी एलिझाबेथच्या मृत्यूपूर्वीच ब्रिटिश मंत्र्यांची शोकसभा तालीम

लंडन (इंग्लंड) – इंग्लंडच्या महाराणी एलिझाबेथ यांच्या मृत्यूपूर्वीच ब्रिटिश मंत्र्यांनी राणीच्या मृत्यूनंतर होणाऱ्या शोकसभेची गुप्तपणे रंगीत तालीम घेतल्याचा धक्कादायक दावा ब्रिटिश मीडियाने केला आहे. महाराणींची तब्येत ठीक नसल्याने त्या गेल्या आठवड्यात सेंट पॉल कॅथेड्रलमध्ये झालेल्या कार्यक्रमाला उपस्थित राहिल्या नाहीत. त्याच दरम्यान ब्रिटिश सरकारमधील काही मंत्र्यांनी महाराणीच्या मृत्यूनंतर घेण्यात येणाऱ्या शोकसभेची गुप्त रीतीनी रंगीत तालीम घेतल्याचे वृत्त आहे. या तालमीला अनेक कॅबिनेट मंत्री आणि अधिकारी हजर होते.

राजपरिवारातील एखाद्या सदस्याच्या मृत्यूपूर्वी नेत्यांनी प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करण्याची ही पहिलीच वेळ आहे.
महाराणीच्या मृत्यूनंतर राजघराणे आणि सरकारद्वारा करण्यात येणाऱ्या सोपस्कारांबाबत गेल्या वर्षी द गार्डियनने माहिती दिली होती. राजघराण्यातील व्यक्तीच्या मृत्यूनंतर सर्वप्रथम चर्चा होते ती राजसिंहासनाच्या वारसाची. त्यानंतर बकिंगहॅम पॅलेसच्या प्रवेशद्वारावर महाराणीच्या मृत्यूची माहिती देणारी सूचना लावण्यात येईल. ही सूचना जगभरातील वृत्तसंस्थांना पाठवण्यात येईल.

रेडियो आणि टीव्ही केंद्रांना शोकसंगीत वाजवण्याच्या सूचना देण्यात येतील. महाराणीचा मृतदेह वेस्टमिनिस्टर हॉलमध्ये दर्शनासाठी ठेवण्यात येईल, तेथेच त्यांना श्रद्धांजली वाहण्यात येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button