breaking-newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

तरुणांचा मद्यपान करून विद्यापीठाच्या वसतिगृहात गोंधळ

पुणे |

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील वसतिगृह क्रमांक पाचमध्ये दोन तरुणांनी सोमवारी रात्री उशिरा मद्यपान करून गोंधळ घातल्याचा आणि वसतिगृहातील प्रथम वर्षांच्या विद्यार्थ्यांना त्रास दिल्याचा प्रकार समोर आला. विद्यापीठ प्रशासनाने या बाबत पोलिसांना कळवल्यानंतर पोलिसांनी या दोन्ही विद्यार्थ्यांना समज देऊन सोडून दिले.

विद्यापीठ प्रशासनाकडून वसतिगृहात अवैधरीत्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांना बाहेर काढण्यात येत आहे. त्यामुळे वसतिगृहातील काही रिकाम्या खोल्या कुलूपबंद करण्यात आल्या आहेत. असे असतानाही वसतिगृह क्रमांक पाचमध्ये दोन तरुण मद्यपान करून गोंधळ घालत असल्याची तक्रार काही विद्यार्थ्यांनी विद्यापीठ प्रशासनाकडे केली. त्यानंतर विद्यापीठ प्रशासनाने पोलिसांना वर्दी दिली. पोलिसांनी या दोन विद्यार्थ्यांना समज देऊन सोडून दिले. दरम्यान, संबंधित दोन विद्यार्थ्यांकडून त्रास देण्यात आलेल्या एका विद्यार्थ्यांची प्रकृती खालावल्याने त्याला रात्रीच आरोग्य केंद्रात दाखल करावे लागले.‘सदर प्रकार निदर्शनास आल्यानंतर पोलिसांकडे लेखी तक्रार करण्यात आली आहे. आता वसतिगृहात अवैधरीत्या राहणाऱ्या विद्यार्थ्यांबाबतची मोहीम अधिक तीव्र करण्यात येईल,’ असे कुलसचिव डॉ. प्रफुल्ल पवार यांनी सांगितले .

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button