breaking-newsआंतरराष्टीय

महाभियोग सुनावणीसाठी ट्रम्प यांना पाचारण

अमेरिकी काँग्रेसच्या समितीने महाभियोग सुनावणीसाठी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना पाचारण केले आहे, ते उपस्थित राहणार नसतील तर त्यांनी अधिकाऱ्यांना पाठवावे, असेही सांगण्यात आले.

त्यांच्या विरोधात सुनावणी करणाऱ्या न्याय खात्याच्या समितीने ट्रम्प यांची पहिली सुनावणी पुढील आठवडय़ात घेण्यात येईल असे समितीने जाहीर केले. तिसऱ्या टप्प्यातील सुनावणीचा हा पहिला भाग असून ‘दी इंपीचमेंट इन्क्वायरी इंटू प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प-कॉन्स्टिटय़ूशल ग्राउंडस फॉर प्रेसिडेन्शियल इंपीचमेंट’ या शीर्षकाखाली त्यांची ही सुनावणी घेतली जाणार आहे.

डेमोक्रॅटिक पक्षाचे वर्चस्व असलेली समिती ही सुनावणी करणार असून ट्रम्प यांनी राजकीय विरोधकांना नामोहरम करण्यासाठी युक्रेनच्या नेत्यांवर दबाव आणून त्यांच्या अधिकारांचा गैरवापर केला की नाही याचा निवाडा यात केला जाणार आहे.

न्याय खात्याच्या समितीचे अध्यक्ष जेरॉल्ड नॅडलर यांनी सांगितले की , ट्रम्प यांच्या विरोधात महाभियोग कारवाई सुनावणी आता नव्या टप्प्यात प्रवेश करीत आहे. पुढील बुधवारी हा टप्पा सुरू होणार असून ४ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजता सुनावणी घेतली जाईल. ट्रम्प यांचे वर्तन  महाभियोग कारवाईस योग्य असल्याचे दाखवून देणे हे आमचे पहिले उद्दिष्ट राहील. महाभियोग समितीच्या चौकशी नियमानुसार ट्रम्प हे उपस्थित राहून बाजू मांडू शकतात याची आपण आठवण करून देत आहोत, असे नॅडलर यांनी म्हटले आहे. साक्षीदार पथकास ट्रम्प किंवा त्यांचे वकील उपस्थित राहून उलट सुलट प्रश्न करू शकतात असे त्यांनी स्पष्ट केले. ट्रम्प यांना त्यांची बाजू मांडण्यासाठी महाभियोग चौकशी समितीपुढे उपस्थित राहण्यास पाचारण करणारे पत्र पाठवण्यात आले आहे.

ट्रम्प यांनी यावर प्रतिक्रिया देताना ट्वीट संदेशात म्हटले आहे की, सुनावणीसाठी अधिकाऱ्यांना पाठवणे आपल्याला आवडले असते पण आपण तसे करणार नाही कारण त्यामुळे या पदाची प्रतिष्ठा जाईल व आगामी काळातील अध्यक्षांना त्याचा फटका बसेल. मी माझ्यासाठी नव्हे तर भविष्यातील अध्यक्षांच्या प्रतिष्ठेची लढाई लढतो आहे. युक्रेन हा भ्रष्टाचारी देश असल्याने त्यांची मदत रोखली होती त्यासाठी दुसरे कुठले कारण नव्हते. वकील डॉन मॅकगहेन यांनी मी काहीच चूक केली नसल्याचा निर्वाळा आधीच दिला आहे. महाभियोग प्रकरण हे डेमोक्रॅट्सनी शोधून काढलेले थोतांड आहे. त्यात काही अर्थ नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button