breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एकतर्फी प्रेमातून शालिमार एक्स्प्रेसमध्ये ठेवल्या जिलेटीन कांड्या; तरुण ताब्यात

लोकमान्य टिळक टर्मिनसवर बुधवारी सकाळी शालिमार एक्स्प्रेसमध्ये जिलेटिनच्या पाच कांड्या आढळून आल्याप्रकरणी टिळकनगर पोलिसांनी गुरूवारी एकाला ताब्यात घेतले. बुलढाणा येथून संबंधित तरुणाला ताब्यात घेण्यात आले असून त्याने प्रेमसंबंधातून हे कृत्य केल्याचे समोर आले आहे.

हावडा येथून बुधवारी सकाळी साडेआठच्या सुमारास ही गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसवर दाखल झाली होती. त्यानंतर ही गाडी सफाईसाठी यार्डात गेली असता सफाई कर्मचाऱ्यांना या जिलेटिनच्या कांड्या आढळून आल्या होत्या.  ही माहिती संपूर्ण टर्मिनस आणि यार्डात पसरल्यानंतर खळबळ उडाली होती. या घटनेनंतर रेल्वे पोलीस दलासह कुर्ला रेल्वे पोलीस, टिळक नगर पोलीस, बॉम्बशोधक व नाशक पथक, श्वान पथक आणि दहशतवादविरोधी पथकही दाखल झाले होते. या सगळ्यांनी पाहणी केल्यानंतर टिळक नगर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल करत तपास सुरू केला होता. जिलेटिनसोबत एक पत्र, एका व्यक्तीचे छायाचित्रही घटनास्थळी आढळून आले होते. या पत्रामध्ये भाजप सरकारला धमकवण्यात आले होते. टिळक नगर पोलिसांनी विशेष तपास पथक स्थापन करून मुंबईबाहेरून एकाला ताब्यात घेतले.

ताब्यात घेतलेल्या तरुणाचे एका तरुणीवर प्रेम होते. मात्र त्या तरुणीने दुसऱ्या पुरुषासोबत विवाह केला. यामुळे तो संतापला होता. त्या तरुणीच्या पतीला बदनाम करण्यासाठी आणि त्याला गुन्ह्यात अडकवण्यासाठी तरुणाने हे कृत्य केल्याचे चौकशीतून समोर आले आहे. संबंधित व्यक्तीला आज (शुक्रवारी) मुंबईत आणले जाणार असून सविस्तर चौकशीनंतरच सर्व प्रकार उघड होईल, असे पोलिसांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button