breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

महापौरांसह भाजप, काँग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हे

सोलापूर –  काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष राहुल गांधी व युवक काँग्रेस अध्यक्ष सत्यजित तांबे यांची प्रतिमा लावून हुतात्मा चौकातील चार पुतळा येथे अवमान करून निदर्शने केल्याप्रकरणी भारतीय जनता पक्षाच्या सोलापूर शहराच्या महापौर शोभा बनशेट्टी यांच्यासह आठ ते दहाजणांविरूद्ध फौजदार चावडी पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. तसेच भाजपच्या तक्रारीवरून काँग्रेसच्या कार्यकर्त्यांवरही पंतप्रधान नरेंद्र मोदींची प्रतिमा दहनप्रकरणी गुन्हे दाखल झाले आहेत.

नगरसेविका संगीता जाधव, संदीप जाधव, जगदीश यनगुंडी, अमोल गायकवाड यांच्यासह 8 ते 10 जणांचा यामध्ये समावेश आहे. अहमदनगर येथे काँग्रेसने पंतप्रधान मोदी यांची प्रतिमा लावून अशाचप्रकारचे आंदोलन केले होते.  युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी मोदी यांच्या प्रतिमेला काळे फासले होते. या आंदोलनाला प्रत्युत्तर म्हणून तसेच आंदोलन सोलापुरातील शहर भाजपच्या कार्यकर्त्यांनी शुक्रवारी सायंकाळी साडेसहा वाजता हुतात्मा चौकात केले होते. या आंदोलनात राहुल गांधी यांची प्रतिमा विनापरवाना लावल्याचा आरोप  झाला होता. याप्रकरणी दोन्ही बाजूंनी परस्परविरोधी तक्रारी आल्याने दोन्ही गटांवर गुन्हा दाखल केले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button