breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडमहिला दिनलेख

जागतिक महिला दिन : अन्यायग्रस्त महिलेला न्याय मिळवून देणारी जाबाज महिला वकील, ॲड. साधना बोरकर!

विनयभंग प्रकरणातील ‘त्या’ आरोपीला अखेर सक्तमजुरी

‘कुसूम’च्या ६ वर्षे संघर्षाला महिला वकिलाची यशस्वी साथ

पिंपरी । महाईन्यूज । विशेष प्रतिनिधी

जागतिक महिला दिना निमित्त महिला हक्क आणि सुरक्षेच्या अणाभाका घेतल्या जात आहेत. महिलांना सन्मान मिळवून देण्याबाबत सर्वच पातळीवर प्रयत्न सुरू आहेत. याच भूमिकेतून पिंपरी-चिंचवडमधील ‘जाबाज’ सरकारी वकील ॲड. साधना बोरकर यांनी विनयभंग प्रकरणातील पीडितेला न्याय मिळवून दिला आहे. संबंधित आरोपीस ३ वर्ष सक्तमजुरीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. ॲड. बोरकर यांनी महिला दिनाच्या पार्श्वभूमीवर एका मुलीला न्याय मिळवून दिला. त्यांच्या या उल्लेखनीय कार्याचे शहरात कौतुक होत आहे.

याबाबत सविस्तर माहिती अशी की, एकतर्फी प्रेमप्रकरणातून मुलीचा विनयभंग केल्याप्रकरणी आरोपी रूपेश जाधव याला पिंपरी येथील न्यायाधीश डी. आर. पठाण यांनी सुनावली ३ वर्ष सक्तमजुरी व १२ हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे.  महाराष्ट्र शासनाच्या वतीने साधना बाळासाहेब बोरकर(पाटील) यांनी या खटल्यांचे कामकाज यशस्वीपणे पाहिले.

पीडितेचे नाव बदलेले (कूसूम) हिने लग्नाला नकार देऊनही आरोपी रूपेश जाधव फिर्यादीला नेहमी त्रास देत असे तिचा पाटलाग करत असे याबाबत फिर्यादीने चिंचवड पोलीस ठाण्यात २०१४ मध्ये धाव घेतली होती.

दरम्यान, साधना बाळासाहेब बोरकर  (सहाय्यक सरकारी अभियोक्ता गट – अ) यांनी आरोपीच्या उलट तपासात एकतर्फी प्रेमाची बाब पिंपरी येथील न्यायाधीश डी. आर. पठाण या न्यायालयाच्या निदर्शनास आणून दिली होती व सरकारच्या वतीने साक्षीदार तपासले होते.

पिंपरी न्यायालयात या गुन्हयात ३ वर्षांची सक्तमजूरीची शिक्षा तसेच, १२०००/- दंडांची शिक्षा व दंड न भरल्यास १ महिना अधिक सक्तमजूरी तसेच फिर्यादी यांना नुकसान भरपाई १००००/- रुपये देण्याची शिक्षा पिंपरीचे न्यायाधीश डी. आर. पठाण यांनी आरोपी रूपेश जाधव याला ठोठावली आहे.

 या गुन्हयाची सुनावणी पिंपरी न्यायालयात झाली. सहाय्यक सरकारी अभियोक्ता साधना बाळासाहेब बोरकर यांनी महाराष्ट्र शासनाची बाजू मांडली तर पैरावी म्हणून हवालदार सी. एच साबळे  चिंचवड पोलिस स्टेशन यांनी काम पाहिले तर गुन्ह्याचा तपास पोलिस निरिक्षक चिंचवड निता मिसाळ यांनी केला.

कोण आहेत ॲड. साधना बोरकर?

साधना बाळासाहेब बोरकर या मुळच्या आंबेडी-सासवड, ता. पुरंदर, जि. पुणे येथील आहेत. शेतकरी कुटुंबात जन्म झालेल्या साधना यांना २००४ मध्ये वडील बाळासाहेब बोरकर गेल्यानंतर आई व लहान भाऊ यांची जबाबदारी सांभाळावी लागली. अत्यंत जिद्दीने त्यांनी Dr. D. Y. Patil Law college येथून २००८-२००९ मध्ये कायद्याचे शिक्षण पूर्ण केले. २०१५ मध्ये महाराष्ट्र शासनाची स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होऊन २०१७ मध्ये त्यांनी सहाय्यक सरकारी अभियोक्ता (गट-अ) म्हणून आपल्या विधी क्षेत्रातील कार्याला सुरूवात केली. त्यांची पहिली नियुक्ती नागपूर येथे होती. जून २०१९ पासून त्या मोरवाडी न्यायालय येथे कार्यरत आहेत.

पाच दिवसांत निकाल देणारा भारतातील पहिला खटला…

ॲड. साधना बोरकर यांनी  नागपूर येथे नियुक्तीस असताना भा.दं.वि. कलम ३९२ प्रमाणे दाखल करण्यात आलेल्या खटल्यात शासनाची बाजू खंबीरपणे मांडली होती. अवघ्या पाच दिवसांत न्यायालयाने संबंधित आरोपीस ३ वर्षे सक्तमजुरीची शिक्षा ठोठावली होती. ‘स्पीडी न्याय’ या कायद्यांतर्गत भारतात प्रथमच अशाप्रकारे ५ दिवसांत निकाल देण्यात आला होता. ॲड. साधना बोरकर यांच्या विधी क्षेत्रातील यशस्वी कारकिर्दीतील हा ‘माईल स्टोन’ आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button