breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापौरांनी केली स्थायीच्या नवीन सदस्यांची निवड

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या तिजोरीची चावी असलेल्या स्थायी समितीमध्ये भाजपचे चार, राष्ट्रवादीचे दोन आणि शिवसेना व अपक्ष प्रत्येकी एक अशा एकूण आठ नवीन नगरसेवकांची वर्णी लागली आहे.

फेब्रुवारी महिन्याची तहकूब महासभा शुक्रवारी (दि. 22) घेण्यात आली. महापालिकेची स्थायी समिती 16 सदस्यांची आहे. त्यामध्ये भाजपचे 10, राष्ट्रवादी काँग्रेसचे 4, शिवसेना 1 आणि अपक्षांचा एक नगरसेवक संख्याबळानुसार नियुक्त होतात. सत्ताधीरी भाजपचे 10 सदस्य समितीत आहेत. यातील गतवर्षी राजीनामा घेतलेल्या सदस्यांच्या जागेवर नियुक्ती झालेल्या भाजपच्या सारिका लांडगे, यशोदा बोईनवाड, अर्चना बारणे, विकास डोळस, अपक्ष साधना मळेकर, राष्ट्रवादी काँग्रेसचे राजू मिसाळ, मोरेश्वर भोंडवे आणि शिवसेनेचे अमित गावडे यांचा दोन वर्षाचा कार्यकाळ फेब्रुवारीअखेर संपत आहे. त्यांच्या जागी या नवीन सदस्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

स्थायीच्या रिक्त जागांवर भाजपचे राजेंद्र लांडगे, संतोष लोंढे, शीतल शिंदे, आरती चोंधे, अपक्ष झामाबाई बारणे, राष्ट्रवादी काँग्रेसचे पंकज भालेकर, मयूर कलाटे आणि शिवसेनेचे गटनेते राहुल कलाटे यांची महापौर राहूल जाधव यांच्या अध्यक्षतेखाली सर्वसाधारण सभेत निवड करण्यात आली. सभागृह नेते एकनाथ पवार यांनी भाजपच्या, विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी राष्ट्रवादीच्या, गटनेते राहुल कलाटे यांनी शिवसेनेच्या तर अपक्षांचे गटनेते कैलास बारणे यांनी अपक्ष नगरसेवकांचे नावे बंद पाकिटातून महापौर राहुल जाधव यांच्याकडे दिली.

त्यानंतर संबंधितांची नावे वाचून स्थायी समितीत नियुक्ती झाल्याची घोषणा महापौर जाधव यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button