breaking-newsताज्या घडामोडीपुणे
पुण्यातील जुना वाडा कोसळला, कोणतीही जीवितहानी नाही
पुणे – शहरातील रविवार पेठेमधील भांडी आळी येथे एक जुना वाडा होता. तो वाडा कोसळल्याची घटना घडली आहे. आज सकाळी साडेनऊ वाजेच्या सुमारास ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच तत्काळ अग्निशामक दलाचे जवान व गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. सुदैवाने कालच संपूर्ण वाडा मोकळा करण्यात आला होता. या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही.