breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापाैर राहूल जाधव म्हणतात, ‘पीएमपी बस खरेदीला चुकून मंजुरी दिली’

पिंपरी ( महा ई न्युज ) – महापालिका सर्वसाधारण सभेत राष्ट्रवादी काँग्रेसने घातलेल्या राड्यात भाजपने विषय मंजूर करण्याचा सपाटा लावला. पण, त्यात मूळ 160 सीएनजी बसेसह उपसूचनेव्दारे एकूण 480 बसेसचा प्रस्ताव या सभेत मंजूर झाला. पण, हा प्रस्ताव गोंधळात चुकून मंजूर झाल्याचे त्या सभेचे अध्यक्ष तथा महापौर राहूल जाधव यांनी म्हटले आहे. तसेच, हा प्रस्ताव थांबविणार असल्याचेही त्यांनी बुधवारी (दि.5) पत्रकारांशी बोलताना सांगितले. 

पुणे महानगर परिवहन महामंडल लि. (पीएमपीएमएल) कंपनीसाठी 160 सीएनजी बस खरेदीसाठी 77 कोटी रुपये खर्च मंजुरीचा प्रस्ताव सभेच्या अजेंड्यावर होता. परंतु, या सभेत सत्ताधारी भाजपने उपसूचनेव्दारे आणखी 60 बसेसाठी 30 कोटी, 260 इलेक्ट्रीक बसेसाठी 130 कोटी रुपये अशा 360 बसेस खऱेदी करण्यासाटी महापालिका सभेने सोमवारी (दि.4) मंजुरी दिली. पालिकेची ही सभाच वादाचा विषय ठरली आहे.

बसखरेदीसह संतपीठ नियोजन समिती, भोसरी रुग्णालयाच्या खासगीकरणावरून वाद सुरू आहे.  त्यात पीएमपीच्या विषयावरून महापौरांनी वेगळीच भूमिका मांडल्याने भाजपच्याच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. या संदर्भात महापौर राहूल जाधव यांनी सभेत झालेल्या गोंधळात हा प्रस्ताव मंजूर करायचा नसताना मंजूर झाल्याचे सांगितले. तसेच, पीएमपीच्या बसखरेदीचा हा प्रस्ताव थांबविणार असल्याचे त्यांनी म्हटले आहे. तसेच, काही दिवसांपूर्वी पीएमपी संचालकपदाचा राजीनामा देण्याचा इशारा महापौरांनी दिला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button