breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापाैरांनी शिक्षण विभागातील अधिका-यांची केली खरडपट्टी

शिक्षण विभागाच्या 15 प्रश्नांवर प्रशासन अधिकारी चिडीचूप  

पिंपरी ( महा ई न्यूज ) – महापालिकेच्या शिक्षण विभागातील अधिका-यांना महापाैर राहूल जाधव यांनी चांगलेच फैलावर घेतले. अधिका-यासह शिक्षकांनी विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता वाढीकरिता प्रयत्न करावा, अशा सूचना करत येत्या तीन महिन्यात पालिका शाळांचा दर्जा सुधारणा करावी, अन्यथा कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा महापाैरांनी अधिका-यांना दिला. याबाबत शाळांच्या समस्या जाणून घेण्यासाठी महापौर राहुल जाधव हे शुक्रवारपासून शाळांचा पाहणी दौरा करणार आहेत. 

महापालिका शिक्षण विभागाची आज (सोमवारी) महापौर राहुल जाधव यांनी आढावा बैठक घेतली. यावेळी आयुक्त श्रावण हर्डीकर, सभागृह नेते एकनाथ पवार, शिक्षण समितीच्या सभापती सोनाली गव्हाणे, सदस्या विनया तापकीर, अश्विनी चिंचवडे, प्रशासन अधिकारी ज्योत्स्ना शिंदे आदी अधिकारी उपस्थित होते.

महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी शिक्षकांनी प्रयत्न करावेत.  शिक्षण अधिका-यांनी साहित्य खरेदीवर लक्ष्य केंद्रित न करता विद्यार्थ्यांची गुणवत्ता वाढीसाठी प्रयत्न करावेत. विषयपत्रिकेवर केवळ खरेदीचे विषय आणू नयेत. चर्चेचे विषय आणावेत. शिक्षण समितीच्या सभेला शाळेतील मुख्याध्यापकांना बोलवावे. त्यांच्या अडी-अडचणी जाणून घेण्यात याव्यात. चांगले उपक्रम केले असल्यास त्याचे सादरीकरण ठेवावे. शाळांना भौतिक सुविधा पुरविण्यार भर देण्यात यावा, अशा सूचना महापाैरांनी केल्या आहेत. तसेच दिल्लीतील शाळांचे कामकाज पाहण्यासाठी शिक्षण विभागातील अधिकारी आणि सदस्यांनी दिल्ली दौरा करावे, असेही त्यांनी सूचविले आहे. तसेच महापाैरांनी शिक्षण प्रशासन अधिका-यांना केलेल्या 15 प्रश्नांवर त्यांनी कोणतेही उत्तर न देता चिडीचुप राहिल्या होत्या.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button