breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेत शासनाचे दोन नवीन सहायक आयुक्त प्रतिनियुक्तीवर झाले रुजू

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या प्रशासकीय सेवेत नाशिकचे प्रशांत जोशी आणि औरंगाबादचे बाळासाहेब खांडेकर यांची पदोन्नतीने सहाय्यक आयुक्तपदी प्रतिनियुक्ती झाली. त्यांची बदली 14 सप्टेंबर 2019 रोजी झाली होती. महापालिकेत बुधवारी (दि. 26) ते रुजू झाले आहेत.

राज्य सरकारने महसूल विभागातील तहसीलदार संवर्गातील अधिका-यांना आणि वन विभागातील अधिका-यांना सप्टेंबर 2019 मध्ये पदोन्नती दिली. या अधिका-यांच्या बदल्या केल्या. राज्य सरकारचे उपसचिव डॉ. माधव वीर यांना याबाबतचा आदेश पारित करण्यात आला. दरम्यान, पिंपरी-चिंचवड महापालिकेत 11 सहाय्यक आयुक्तांची पदे मंजूर आहेत. त्यात 6 शासनाने दिलेले प्रतिनियुक्‍तीवरील आणि 5 महापालिकेचे अधिकारी असा कोटा आरक्षित आहे.

पिंपरी-चिंचवड महापालिकेत राज्य सरकारच्या सेवेतील ‘सीईओ’ केडरचे भांडार विभागाचे मंगेश चितळे, नागरवस्ती विभागाच्या स्मिता झगडे, आकाश चिन्ह परवाना विभागाचे सुनील अलमेलकर कार्यरत आहेत. आता नवीन दोन अधिका-यांची नियुक्ती झाल्याने प्रतिनियुक्तीवरील एक पद रिक्त आहे. तर, महापालिकेतील प्रशासन विभागाचे मनोज लोणकर, झोपडपट्टी पुनर्वसन विभागाचे चंद्रकांत इंदलकर, ‘अ’ प्रभागाच्या आशादेवी दुरगुडे, ‘ह’ प्रभागाचे क्षेत्रिय अधिकारी संदीप खोत, ‘क’ प्रभागाचे अण्णा बोदडे असे पाच सहायक आयुक्त कार्यरत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button