breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

या तीन आजारांवरील उपचारासाठी रुग्णांना पालिका करणार 50 हजारांची मदत

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिका हद्दीतील गोरगरीब नागरिकांच्या आरोग्यासाठी महापालिकेद्वारे पद्मविभूषण सुषमा स्वराज जन आरोग्य योजना सुरू करण्यात येणार आहे. त्यासाठी 2 कोटी रुपयांची तरतूद महापालिकेच्या 2020-21 या आगामी अर्थसंकल्पात करण्यात आली आहे. या योजनेद्वारे तीन प्रकारच्या शस्त्रक्रिया अथवा रोगांवर उपचार घेण्यासाठी रुग्णाला महापालिका 50 हजार रुपये अर्थसहाय करणार आहे.

पद्मविभूषण सुषमा स्वराज जन आरोग्य योजनेचा आगामी अर्थसंकल्पात समावेश करून त्यासाठी पुरेशी तरतूद करण्याची सूचना आमदार लक्ष्मण जगताप यांनी स्थायी समितीचे सभापती विलास मडिगेरी यांना केली होती. त्यानुसार आज झालेल्या स्थायी समितीच्या विशेष सभेत या योजनेचा अर्थसंकल्पात समावेश करण्यात आला आहे. त्यासाठी 2 कोटींची अर्थसंकल्पात तरतूद करण्यात आली आहे. या योजनेमधून ह्रदय शस्त्रक्रिया, किडनी ट्रान्सप्लांट आणि कर्करोग या खर्चीक आजारांवर उपचार घेण्यासाठी पालिका पन्नास हजार रुपये मदत करणार आहे.

या योजनेचा लाभ घेण्यासाठी रुग्णाचे वार्षिक उत्पन्न 1 लाख रुपये असणे अनिवार्य आहे. वार्षिक उत्पन्नाचा दाखला, पिंपरी-चिंचवड शहरातील रहिवाशी, आधार कार्ड, मतदान कार्ड, कुटुंबियांचा एकत्रीत फोटो, अर्ज व 200 रुपये शूल्क भरून नागरिकांनी या योजनेचे कार्ड प्राप्त करावे लागेल. ही योजना धर्मादाय न्यायाकडे नोंदणीकृत रुग्णालयांनाच लागू असणार आहे. त्यामुळे शहरातील गरजू रुग्णाला त्याचा निश्चितच फायदा होणार आहे. योजनेच्या नियम अटींमध्ये सूचना व हरकतींनुसार बदल करण्यात येतील, अशी माहिती सभापती मडिगेरी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button