breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड
महापालिकेत दिवंगत राष्ट्रपती डाॅ. कलाम, माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींचे तैलचित्र लावणार
महापालिका सर्वसाधारण सभेत ठराव
पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या यशवंतराव चव्हाण सभागृहात दिवंगत राष्ट्रपती डाॅ. ए.पी.जे. अब्दुल कलाम यांचे तैलचित्र लावण्यात येणार आहे. तर माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे तैलचित्र महापालिका इमारतीत दर्शनी भागात आणि सर्व शाळांमध्ये लावण्याचा ठराव आज (सोमवार) झालेल्या सर्वसाधारण सभेत करण्यात आला. यावेळी सभेच्या अध्यक्षस्थानी महापाैर राहूल जाधव हे होते.
पिंपरी-चिंचवड महापालिकेची सर्वसाधारण सभा आज (सोमवारी) आयोजित केली होती. महापौर राहुल जाधव सभेच्या अध्यक्षस्थानी होते. या सभेत सर्वपक्षीय नगरसेवकांनी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना श्रद्धांजली वाहिली.