Uncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या शिक्षण विभागाची श्वेतपत्रिका काढा – नगरसेविका आश्विनी चिंचवडे यांची आयुक्तांकडे मागणी

पिंपरी ( महा ई न्यूज )-  महापालिका शिक्षण विभागावर दरवर्षी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात येतो. त्यामुळे सर्व कामाची सखोल चौकशी करुन श्वेतपत्रिका काढावी, अशी मागणी शिक्षण समितीच्या सदस्या अश्विनी चिंचवडे यांनी आयुक्तांकडे केली आहे.

पिंपरी चिंचवड महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की,  महापालिकेच्या शिक्षण विभागाने प्राथमिक शिक्षण गुणवत्तापूर्ण देणे हे आद्यकर्तव्य आहे. महापालिका शाळांची घटलेली पटसंख्या, 39 शाळा बंद करण्याचा निर्णय, शासनाचे एप्रिल मे मध्ये बदल्याबाबत आदेश असताना देखील चालू शैक्षणिक वर्षांमध्ये करण्यात आलेल्या बदल्या, शाळांमधील 80% संगणक प्रणाली बंद, गुणवत्ता वाढीसाठी सुरु केलेल्या सेमी इंग्रजी धोरणाकडे केलेले दुर्लक्ष, शाळा इमारतीमध्ये भौतिक सुविधाबाबत पाठपुरावा न केल्यामुळे शाळा इमारतीची दुरवस्था, मैदानाचा अभाव, स्वच्छ भारत अभियान शाळामध्ये परिणाम कारक न राबविल्यामुळे अस्वच्छता, अनेक शाळा मुख्याध्यापकाविना, रोस्टरनुसार रिक्त जागावर शिक्षक नेमणे,

शहरातील खासगी व महापालिका शाळा नुसार पर्यवेक्षक नसणे, बायोमेट्रिक हजेरी यंत्रणेचा बट्याबोळ. त्यामुळे शिस्तीचा अभाव, शालेय पोषण आहार तपासणी पथके फिरत नसल्यामुळे शालेय पोषण आहार ठेकेदाराकडून निकषाचे होणारे उल्लंघन, शालेय साहित्य खरेदीतील संशयास्पद धोरण व निविदा प्रक्रिया, शिक्षण मंडळात अनेक वर्ष ठाण मांडून बसलेले कर्मचारी, अधिकारी व कर्मचारी वर्गाची जॉब चार्टनुसार न होणारी कामे, शिक्षण विभागातील माहिती नगरसेवकांनी पत्रव्यवहार केला तरी वेळेत कधीही दिली जात नाही. तर,  सामान्य नागरिकांना कोण न्याय देणार त्यामुळेच माहिती अधिकारात देखील माहिती वेळेत न दिल्याबद्दल  राज्य माहिती आयुक्ताकडून झालेली दंडात्मक कारवाई अशा अनेक अनियमित व चुकीच्या कामकाजामुळे शिक्षण विभागाच्या कारभारावर अनेकवेळा महापालिका सभागृहात आरोपप्रत्यारोप झालेले आहेत. त्यामुळे शिक्षण विभागातील कामकाजाची सविस्तर चौकशी करुन श्वेतपत्रिका काढण्यात यावी, असे मागणीही चिंचवडे यांनी निवेदनाद्वारे केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button