breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेच्या मृत अधिकारी-कर्मचार्‍यांच्या वारसाना सुरक्षा कवच योजनेचा लाभ द्या

उपमहापाैर तुषार हिंगे यांचे आयुक्त श्रावण हर्डिकर यांच्याकडे मागणी

पिंपरी |महाईन्यूज|

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील दोन कर्मचार्‍यांना कोरोनाची लागण झाल्याने त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्या वारसाला विम्यातील सुरक्षा कवच योजनेचा लाभ त्वरीत दिला जावा, अशी सूचना उपमहापौर तुषार हिंगे यांनी मंगळवारी (दि.21) केली आहे. या संदर्भात त्यांनी आयुक्त श्रावण हर्डीकर यांच्याशी चर्चा करून सूचना केली आहे.

उपमहापौर तुषार हिंगे म्हणाले की, पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वाकड माध्यमिक शाळेतील शिक्षक राजेंद्र तुपे आणि यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रूग्णालयातील रुग्णालयातील उपलेखापाल सिद्धार्थ जगताप या दोघाांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. या दोन्ही कर्मचार्‍यांना कोरोना महामारी प्रतिबंधात्मक उपाययोजनेचे कामकाज करत असताना कोरोना विषाणूचा संसर्ग झाला आहे.

महापालिकेने कोरोना विमा सुरक्षा कवच योजना यापूर्वी जाहीर केली आहे. त्या योजनेअंतर्गत एखादा अधिकारी किंवा कर्मचारी कर्तव्य बजावित असताना कोरोनामुळे मरण पावल्यास त्याच्या वारसाला 75 लाख रूपये विमा रक्कम मिळेल आणि वारसाला अनुकंपा तत्वावर महापालिकेत नोकरी दिली जाईल, असे जाहीर केले होते.

राजेंद्र तुपे व सिद्धार्ध जगताप हे दोन्ही कर्मचारी आपले कर्तव्य बजावित असताना त्यांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. तरी त्यांच्या वारसाला विमा योजनेअंतर्गत मिळणारी रक्कम द्यावी. तसेच त्यांच्या वारसाला महापालिकेत नोकरी द्यावी. मृत कर्मचार्‍याची पी.एफ.चा निधीची रक्कम वारसाला द्यावी, अशी सूचना उपमहापौर तुषार हिंगे यांनी आयुक्तांना केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button