breaking-newsराष्ट्रिय

मेहुल चोक्सीला आणखी एक दणका, थायलंडमधील कंपनी जप्त

पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळ्याप्रकरणी फरार असलेल्या मेहुल चोक्सीला अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) दणका दिला आहे. थायलंडमधील मेहुल चोक्सीच्या कंपनीवर ईडीने जप्तीची कारवाई केली असून या कंपनीची किंमत भारतीय चलनानुसार 13 कोटी रुपये इतकी आहे.

थायलंडमधील एब्बेक्रेस्ट लिमिटेड या कंपनीवर ईडीने शुक्रवारी जप्तीची कारवाई केली. ही कंपनी गीतांजली समुहाअंतर्गत येते. ईडीने याबाबत माहिती देताना सांगितले की, आर्थिक गैरव्यवहार प्रतिबंधक कायद्यांतर्गत (पीएमएलए) तपास करताना असे निष्पन्न झाले की एब्बेक्रेस्ट लिमिटेड या कंपनीने गैरव्यवहार करुन पीएनबीतून जारी केलेल्या एलओयूचा लाभ घेतला होता. ही रक्कम 92. 3 कोटी रुपये इतकी होती. तपासात या मालमत्तेची माहिती समोर आल्यानंतर कंपनीच्या मालकीबाबत सखोल तपास करण्यात आला. यानंतरच कंपनीवर जप्तीची कारवाई करण्यात आली, असे ईडीच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

दरम्यान, ईडीने गेल्या वर्षी ११ जून रोजी मुंबईतील पीएमएलए कोर्टात फरारी आर्थिक गुन्हेगार अध्यादेशानुसार मेहुल चोक्सीविरोधात अर्ज दाखल केला होता. या अर्जावरील सुनावणीत  मेहुल चोक्सीने नुकतेच वकिलांमार्फत ३४ पानी उत्तर दिले होते. , मी पंजाब नॅशनल बँकेला थकबाकी फेडण्यासंदर्भात प्रस्ताव दिला होता. यासंदर्भात अजूनही पत्रव्यवहार सुरु आहे. ४१ तासांचा विमान प्रवास करुन भारतात परतणे अशक्य असल्याचे त्याने यात म्हटले होते.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button