breaking-newsताज्या घडामोडीपुणेमुंबई

मंकी हिल ते कर्जतदरम्यान महिनाभर ‘मेगाब्लॉक’;अनेक एक्स्प्रेस रद्द

मध्य रेल्वेच्या मुंबई-पुणे रेल्वे मार्गावरील मंकी हिल ते कर्जतदरम्यान तांत्रिक कामांमुळे 30 नोव्हेंबरपर्यंत म्हणजे जवळपास महिनाभर ब्लॉक घेण्यात येणार आहे. कर्जत दिशेकडील रेल्वे मार्गावर हा ब्लॉक असेल. या ब्लॉकचा परिणाम अनेक लांब पल्ल्यांच्या गाड्यांवर झाला असून काही एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत.

मंकी हिल ते कर्जत दरम्यान कर्जत दिशेकडील मार्गावर तांत्रिक कामासाठी २२ ऑक्टोबरपासून ते १ नोव्हेंबरपर्यंत ब्लॉक घेतला होता. मात्र या कालावधीत या मार्गावरील तांत्रिक बाबीची पूर्तता होणार नसल्याने मध्य रेल्वे प्रशासनाने नोव्हेंबरचा संपूर्ण महिना ब्लॉक घेण्यात येईल, असं सांगितलं आहे. यामुळे दिवाळीच्या सुट्टीनिमित्त बाहेरगावी गेलेल्या प्रवाशांचे हाल होणार आहेत.

ब्लॉकमुळे या मार्गावरून धावणाऱ्या मुंबई ते पुणे प्रगती एक्स्प्रेस, मुंबई-पंढरपूर-मुंबई एक्स्प्रेस, मुंबई-विजापूर-मुंबई, पनवेल-नांदेड-पनवेल साप्ताहिक, पनवेल-पुणे-पनवेल पॅसेंजर या एक्स्प्रेस रेल्वे गाड्या रद्द करण्यात येणार आहेत. याशिवाय, मुंबई-कोल्हापूर कोयना एक्स्प्रेस, मुंबई-हैदराबाद-मुंबई हुसैनसागर एक्स्प्रेस, एलटीटी-विशाखापट्टनम-एलटीटी, एलटीटी-हुबली-एलटीटी, पनवेल-नांदेड-पनवेल या एक्स्प्रेस ३१ नोव्हेंबरपर्यंत पुण्यापर्यंतच चालविण्यात येणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button