breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिकेचा अर्थसंकल्प आयुक्त सोमवारी स्थायीकडे सादर करणार

अर्थसंकल्पात उपसूचना देण्यास भाजप पदाधिकां-याकडून नगरसेवकांना नकार

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचा सन 2020-2021 या आर्थिक वर्षांचा अर्थसंकल्प आयुक्त श्रावण हर्डिकर हे (सोमवारी) स्थायी समितीकडे सादर करणार आहे. या अर्थसंकल्पात पिंपरी-चिंचवडकरांना नवीन काय मिळणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

पिंपरी चिंचवड महापालिकेचा हा 38 वा अर्थसंकल्प असून आयुक्त श्रावण हर्डीकर हे तिसरा अर्थसंकल्प सादर करणार आहे. याकरिता नगरसचिव कार्यालयाकडून सोमवारी (दि.17) सकाळी 11 वाजता विशेष स्थायी समितीचे आयोजन केले आहे. यावेळी आयुक्त हे अर्थसंकल्प सादर करणार आहेत.

दरम्यान, मागील वर्षी मूळ 4, 620 कोटी तर केंद्र सरकारच्या पुरस्कृत योजनांसह 6 हजार 183 कोटी रुपयांचा अर्थसंकल्प होता. यंदा किती कोटींचा अर्थसंकल्प असेल. त्यामध्ये वाढ होणार की घट होणार, शहरवासीयांना नवीन काय मिळणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button