breaking-newsपिंपरी / चिंचवड

गोरगरीबांना आर्थिक मदतीसह अन्नधान्य द्या; वंचित बहूजन आघाडीची मागणी

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी|

पिंपरी चिंचवड शहरात कोरोना रुग्णाची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे. त्यामुळे शहरात पुन्हा लाॅकडाऊन करावा, अशी मागणी काही राजकीय मंडळीकडून होत आहे. मात्र, शहरातील गोरगरीब, गरजू, कष्टकरी वर्गांमध्ये उपासमारीची वेळ आलेली आहे. त्यांना आर्थिक मदत आणि अन्नधान्याचे वाटप करावे, अशी मागणी वंचित बहूजन आघाडीचे गुलाब पानपाटील यांनी केलेली आहे.

त्यांना महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना निवेदन दिले. त्यात म्हटले की, पिंपरी-चिंचवड शहरात सत्ताधारी – विरोधकांच्या वतीने महापालिका प्रशासनाकडे लॉकडाऊन वाढवण्याची, त्याची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याची मागणी केली आहे. पिंपरी चिंचवड शहर औद्योगिक नगरी म्हणून ओळखली जाते. कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे तसेच लॉकडाऊन  केल्याने शहरातील कष्टकरी मजूर, कामगार व छोटे व्यापारी यांच्यावर उपासमारीची वेळ आलेली आहे. त्याचबरोबर लोकांच्या उद्रेकदेखील झालेला आहे.

महापालिका प्रशासन सत्ताधारी व विरोधी पक्षातील नगरसेवक हे कोरोना विषाणू रोखण्यास व उपाययोजना करण्यास अपयशी झालेले आहेत. त्यांनी लक्षपूर्वक दुर्लक्ष केल्याने आणि त्यांच्याकडे कोणतेही ठोस यंत्रणा नसल्याने तरुणामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. शहरात लॉकडाऊन वाढवण्याची मागणी करणा-यांनी प्रथम शहरातील कष्टकरी, मजूर कामगार व छोटे व्यापारी यांच्याकरिता आर्थिक मदत जाहीर करावी, त्यांच्यासाठी अन्नधान्याची व्यवस्था करावी. अशी मागणी वंचित बहूजन आघाडीने केलेली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button