breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

करोना विषाणूने चीनपाठोपाठ दक्षिण कोरियाला धडक …

करोना विषाणूने चीनपाठोपाठ दक्षिण कोरियाला धडक दिली आहे… युरोप आणि आखाती देशांमध्येही हातपाय पसरले आहेत. दरम्यान, चीनमध्ये करोनाचे आणखी १५० बळी नोंदवले असून, एकूण बळींची संख्या २६६३ वर पोहोचली आहे. चीनमधील करोनाग्रस्तांची संख्या ७७ हजारांवर पोहोचली आहे…

दक्षिण कोरिया, इटली आणि इराण या देशांना करोना विषाणूने विळखा घातला असून, गेल्या काही आठवड्यांपासून तेथे ‘करोना’चा संसर्ग वाढत आहे. बहारिन आणि कुवेतमध्ये सोमवारी ‘करोना’चे पहिले रुग्ण नोंदवण्यात आले … इराणमध्ये आठ बळी नोंदविण्यात आले आहेत. दक्षिण कोरियात संसर्ग वाढला असून, आणखी १६१ रुग्ण नोंदवले आहेत. एकूण रुग्णसंख्या ही ८९३ वर पोहोचली आहे. या देशात अतिदक्षतेचा इशारा देण्यात आला आहे. त्यातही डेगू शहरात रुग्णांची संख्या अधिक असून, शहरात गर्दीच्या ठिकाणी शुकशुकाट जाणवत आहे. इटलीमध्ये १५० पेक्षा अधिक लोकांना संसर्ग झाला आहे.

इटलीच्या अनेक भागांत लोकांना जास्त काळ घरी थांबण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अफगाणिस्तानही करोना विषाणूचा पहिला रुग्ण नोंदविण्यात आला. नागरिकांनी देशाच्या पश्चिमेकडे विशेषत: इराणच्या दिशेने प्रवास करणे टाळावे, अशी सूचना अफगाण सरकारने केली आहे.दरम्यान, करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर आशियातील शेअर बाजारावरही परिणाम झाला असून निर्देशांकात घसरण पाहायला मिळाली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button