breaking-newsUncategorizedताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका विद्युत विभाग दीड कोटीचे विविध केबल, साहित्य खरेदी करणार

स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी प्रस्ताव 

पिंपरी – महापालिकेच्या विद्युत विभागाने ई निविदा काढून आवश्यक विविध प्रकारच्या केबल्स, वायर्स साहित्य खरेदी करण्यात येणार आहे. याकरिता आॅनलाईन मागविलेल्या निविदा प्रक्रियेत चार निविदा प्राप्त झाल्या. त्यामध्ये 1 ते 6 या सर्व साहित्याचे प्राप्त लघुत्तम दर एकूण एक कोटी 44 लाख 30 हजार 500 हे अंदाजपत्रकीय दरापेक्षा 0.31 टक्केने कमी आहे.  त्यामुळे सदरील दर स्विकृत करुन त्याचेबरोबर करारनामा करुन ते पुरवठा आदेश निर्गत करणेस व  येणा-या खर्चास मान्यता देण्याचा प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवला आहे. 

पिंपरी चिंचवड महापालिकेच्या विद्युत विभाग आवश्यक विविध प्रकारचे केबल्स, वायर्स, साहित्य खरेदी करणार आहे. याकरिता विद्युत विभागाने ई निविदा मागविल्या होत्या. त्यानूसार चार निविदा प्राप्त झाल्या. यामध्ये मे.पायोनियर सेल्स यांचे प्राप्त लघुत्तम एक ते पाच याप्रमाणे एकूण चार साहित्याचे दर 36 लाख 65 हजार हे अंदाजपत्रकीय दरापेक्षा 0.95 टक्केने कमी आहे. मे. रुपलक्ष्मी इलेक्ट्रील्स यांचे प्राप्त लघुत्तम दर एक बाबीसाठी 54 लाख 68 हजार हे अंदाजपत्रकीय दरापेक्षा 0.15 टक्केने कमी आहे. तसेच मे. हायटेक इलेक्ट्रीकल्स यांचे प्राप्त लघुत्तम दर हे 52 लाख 97 हजार 500 हे अंदाजपत्रकीय दरापेक्षा 0.05 टक्केने कमी आहे.

दरम्यान, विद्युत विभागाच्या एकूण केबल व साहित्य खरेदीत एक ते सहा साहित्यांचे प्राप्त लघुत्तम दर एकूण एक कोटी 44 लाख 30 हजार 500 हे अंदाजपत्रकीय दरापेक्षा 0.31 टक्केने कमी असल्याने सदर दर स्विकृत करुन त्यांचेबरोबर करारनामा करुन पुरवठा आदेश निर्गत करणेस आणि येणा-या खर्चास मान्यता देण्यासाठी सदरचे प्रस्ताव स्थायी समितीपुढे मान्यतेसाठी ठेवले आहेत.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button