breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
बिलोली तालुक्यात आढळला कोरोनाचा रूग्ण, बारा जण क्वारंटाईन
बिलोली | बिलोली तालुक्यातील केरूर येथील एका 35 वर्षीय अविवाहित युवकास कोरोनाची लागण झालीय, यामुळे ग्रामीण भागात हा कोरोनाचा पहिलाच पाॕझिटीव्ह रूग्ण आढळून आला, या युवकावर बिलोलीच्या कोरोना सेंटरमध्ये उपचार सुरु करण्यात आले आहेत. सद्या प्रकृती स्थिर आहे पण या युवकाच्या संपर्कात आलेल्या बारा जणांना क्वारंटाईन करण्यात आले आहे. यामुळे तालुक्यात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.