breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरीच्या मिलिटरी डेअरी फार्मवर दहा हजार झाडे लावणार

 पिंपरी –  महापालिकेच्या वतीने पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मवर नव्याने दहा हजार झाडांची लागवड करण्यात येणार आहे. तसेच त्या झाडांची देखभाल व संरक्षण तीन वर्षे कालावधीसाठी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाकडून केली जाणार आहे.

महाराष्ट्र शासनाच्या नगरविकास विभाग शासन निर्णय 31 जूलै 2015 पासून पावसाळा सुरु झाल्यानंतर नागरी भागात हरित शहर योजना राबविण्यात येत आहे. याकरिता शहर भागात मोकळ्या मैदानासह आवश्यक ठिकाणी वृक्ष लागवड करण्यात येत आहे. वृक्ष लागवड, त्याची देखभाल व संरक्षणाची जबाबदारी महाराष्ट्र राज्य वनविकास महामंडळाकडून करण्यात येत आहे. याबाबत महामंडळाला सदरील कामाचा अनुभव असल्याने विना निविदा थेट पध्दतीने वृक्ष लागवडीचे काम देण्यात येत आहे.

त्यानूसार पिंपरीतील मिलिटरी डेअरी फार्मवर सुमारे 10 हजार वृक्षारोपण करुन त्याची देखभाल व संरक्षण तीन वर्षे कालावधीसाठी प्रतिरोप 930 याप्रमाणे करण्यात येणार आहे. याबाबतचा महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांनी विना निविदा थेट प्रस्ताव आणि  त्या कामास येणारी 93 लाख रुपये खर्चास मान्यता देण्याचा विषय स्थायी समितीपुढे ठेवला आहे.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button