breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका जिजामाता रुग्णालयातील जेवणात सापडल्या अळ्या

पिंपरी |महाईन्यूज|प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरी येथील जिजामाता रुग्णालयात एका रुग्णाच्या जेवणात अळ्या आढळून आल्या आहेत. त्यामुळे करोनाचे रुग्ण व त्यांच्या नातेवाइकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. याबाबतच्या तक्रारींकडे तातडीने लक्ष्य देण्याची मागणी करण्यात येत आहे.

करोना रुग्णालयात निकृष्ट दर्जाचे जेवण दिले जात असल्याच्या तक्रारी वाढत असतानाच जेवणात अळ्या आढळल्याचा प्रकार समोर आला आहे. त्यामुळे याबाबत प्रशासन किती गांभीर्याने वागत आहे, असा प्रश्‍न उपस्थित झाला आहे.

पिंपरी-चिंचवड शहरात करोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. या रुग्णांना जेवण पुरविण्यासाठी खासगी संस्थांना महापालिकेने कंत्राट दिले आहे. मात्र या संस्था निकृष्ट जेवण देत असल्याचे आरोप होत आहेत. जेवण बेचव असल्याने टाकून दिल्याचे प्रकार जिजामाता रुग्णालयामध्ये सातत्याने घडत होते. काही सामाजिक कार्यकर्त्यांनी महापालिका आयुक्त श्रावण हर्डीकर यांना याबाबत निवेदन दिले आहे. मात्र त्यानंतरही जेवणाचा दर्जा सुधारण्यात आलेला नाही, असे आरोप होत आहेत.

जिजामाता रुग्णालयातील करोना रुग्णांना शनिवारी (दि. 15) दिलेल्या जेवणात अळ्या आढळल्याने रुग्णांनी तक्रार केली आहे. मात्र त्याकडे दुर्लक्ष केल्याने रुग्णांनी त्याचा व्हिडीओ व फोटो सोशल मीडियावर व्हायरल केले आहेत. त्यामुळे हा प्रकार समोर आला आहे. महापालिकेने जेवणाचे कंत्राट दिलेले ठेकेदार याला जबाबदार आहेत. संबंधित ठेकेदार व अधिकारी यांच्यावर याप्रकरणी कारवाई करावी, अशी मागणी माकपच्या शहर समितीचे सचिव गणेश दराडे यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button