TOP Newsताज्या घडामोडीदृष्टीक्षेपदेश-विदेशपश्चिम महाराष्ट्रपिंपरी / चिंचवडराजकारणराष्ट्रिय

नागरी सुरक्षेकडे दुर्लक्ष झाल्यामुळे जीवघेणे अपघात : कमलेश रणावरे

आकाश चिन्ह विभागाच्या बेजबाबदार कारभारावर 'आप'ची कठोर टीका

पिंपरी: पिंपरी शहरात विविध प्रभागात मोठमोठी होर्डिंग लावताना कोणत्याही सुरक्षा नियमांचे पालन केले जात नाही.प्रचंड फॅब्रिकेटेड लोखंडी होर्डिंग सार्वजनिक ठिकाणी लावलेली असतात.मुळात ही होर्डिंग वादळ वाऱ्याच्या वेगाला तग धरून राहतील किंवा ती गर्दीच्या ठिकाणी असता कामा नये,अशी काळजी घेणे मनपा आकाशचिन्ह विभागाचे काम आहे.अशा होर्डिंग कोसळून २०१८ मध्ये पुणे शहरात ४ नागरिक मृत्युमुखी पडले होते.
या शहरात प्रशासकीय राजवट आल्यापासून विविध रस्ते अपघातात २९० नागरिक मृत्युमुखी पडले आहेत.लोकांच्या डोक्यावर टांगलेले मृत्यूचे सांगाडे वादळामुळे पडले आहेत. होर्डिंग कोसळून रावेत येथे ५ नागरिकांचे हकनाक जीव गेले आहेत.या घटनेला मनपा प्रशासन आणि आकाशचिन्ह विभागाचे अधिकारी जबाबदार आहेत,या दुर्दैवी घटनेचा आम आदमी पार्टीचे कमलेश रणवरे यांनी निषेध केला आहे.तसेच दुर्दैवी घटनेला जबाबदार असलेल्या अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.
भविष्यात अशा दुःखद घटना घडू नये व निष्पाप लोकांचे जीव नाहक जाऊ नये, म्हणून आम आदमी पार्टी सर्व सामान्य जनते मार्फत खालील मागण्या करत आहोत. 
नगरपालिकेने अधिकृत करून दिलेले होर्डिंग ज्यांना नगरपालिका परमिशन देते, असे बोर्ड हे मुख्य रस्त्यापासून शंभर फूट लांब असावे. जेणेकरून, ते कोसळले तर रस्त्यावरती किंवा फुटपात वरती असणाऱ्या लोकांना त्याची हानी पोहोचू नये. 

होर्डिंग च्या आसपास कुठलीही रहिवासी सदनिका असू नये जेणेकरून वादळी वाऱ्यामध्ये त्या सदनिकेला व सदनिकेमध्ये राहणाऱ्या लोकांना इजा होऊ नये किंवा त्यांचा जीव जाऊ नये. शहरातील सर्व अनाधिकृत होर्डिंग काढून टाकून त्यांच्यावरती सदर कायदेशीर कारवाई करावी. सदर सर्व अधिकृत होर्डिंग ची स्ट्रक्चरल ऑडिट करून त्यांना रीतसर परवाना द्यावा. ज्या निष्पाप लोकांचा जीव या दुर्दैवी घटनेत गेलाय अशांच्या नातेवाईकांना प्रत्येकी २५ लाख रुपये नगरपालिकेने स्वतःची

जबाबदारी स्विकारुन  नुकसान भरपाई द्यावी.
सदरच्या घटनेमध्ये जबाबदार अधिकाऱ्यावरती कमिशनर साहेबांनी सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून मृत व जखमी लोकांना न्याय द्यावा अशी मागणी आप च्या वतीने चेतन बेंद्रे, ब्रम्हानंद जाधव, रोहित सरनोबत, डॉ. अमर डोंगरे आणि सीताताई केंद्रे यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button