breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

महापालिका आयुक्तांकडून भाजपची दलाली; शिवसेनेचा आसूड

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचे राजकीय करिअर उध्दवस्त करण्यासाठी पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हार्डीकर यांनी भोसरीतील अतिक्रमण धारकांना खासदार आढळराव पाटील यांच्या तक्रारीची प्रत नोटीसींसोबत जोडून दिली आहे. हे राजकीय षडयंत्र असून आयुक्त हार्डीकर हे नागरिकांचे सेवक नसून भाजपचे दलाल आहेत, अशा शब्दांत शिवसेनेच्या महिला आघाडी जिल्हा संघटिका सुलभा उबाळे यांनी आयुक्त हार्डीकरांवर असूड ओढला आहे.

भोसरीतील अतिक्रमणांवर कारवाई करण्याची मागणी शिवसेना खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांनी आयुक्त हार्डीकर यांच्याकडे केली होती. त्यानुसार आयुक्त हार्डीकर यांनी जुन्या व्यावसायिकांना नोटीसा दिल्या. त्यांच्या नोटीशीबरोबर खासदार आढळराव पाटील यांच्या पत्रांची झेरॉक्स जोडून दिल्या आहेत, असे उबाळे यांनी म्हटले आहे. याच्या विरोधात शिवसेनेने प्रसिद्धीपत्रक काढून आयुक्त हर्डीकरांवर जोरदार ताशेरे ओढले आहेत.

भोसरीतील शासकीय जागा, तसेच रस्त्यालगत बेकायदा शेड मारून भाड्याने देण्याचे काम सध्या सुरू आहे. त्याठिकाणी राजकीय गुंड पोसण्याचे काम देखील काही मंडळी करीत आहेत. आळंदी रोड, भोसरी या भागात अशाप्रकारचे नव्याने बेकायदा पत्राशेड उभारण्यात आली आहेत. त्यांच्यावर कारवाई करावी, असे लेखी पत्र शिवसेना खासदार आढळराव यांनी महापालिका आयुक्त हर्डीकर यांना दिले होते. त्यानुसार गेल्या 25 वर्षांपासून व्यवसाय करणा-यांना जागा देणे अपेक्षित असताना त्यांना कारवाईच्या नोटीसा दिल्या जात आहेत. त्यांच्या नोटीशीबरोबर खासदार आढळराव यांच्या पत्रांची झेरॉक्स जोडून वाटण्यात आल्या आहेत. त्यांची बदनामी करण्याचा उद्योग प्रशासनाकडून केला जात आहे. नव्याने उभारण्यात आलेले पत्राशेड काढून टाकावे. त्याठिकाणी होणारी लाईट व पाण्याची चोरी थांबवावी, अन्यथा शिवसेनेतर्फे जनआंदोलन करण्यात येईल, असा इशारा शिवसेना महिला आघाडी जिल्हा संघटक उबाळे आणि भोसरी विधानसभा प्रमुख धनंजय आल्हाट यांनी दिला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button