पहाटेच्या वेळी एकट्याने जात असलेल्या तरुणावर ब्लेडने वार करून लुटले
पिंपरी l प्रतिनिधी
आंबेडकर चौक पिंपरी येथे पाच जणांणी मिळून एका तरुणाला मारहाण करून ब्लेडने वार केले. त्यानंतर तरुणाकडील एक लाख 40 हजार 300 रुपयांचा ऐवज जबरदस्तीने काढून घेतला. याप्रकरणी दरोड्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना मंगळवारी (दि. 28) पहाटे घडली.
फय्याज राशद शहा (वय 29, रा. दत्तनगर, चिंचवड) यांनी याप्रकरणी पिंपरी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी पाच अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी पहाटे तीन वाजताच्या सुमारास फिर्यादी शहा आंबेडकर चौक पिंपरी येथून चौकातून नेहरूनगरकडे जाणाऱ्या रस्त्याने जात होते. त्यावेळी एम एच 14 / 2714 (पूर्ण नंबर माहिती नाही) एक क्रमांकाच्या रिक्षात बसलेल्या पाच जणांनी शहा यांनी लाथाबुक्क्यांनी तसेच बांबूने मारहाण केली. त्यातील एकाने शहा यांच्या हातावर ब्लेड मारून त्यांना जखमी केले. त्यानंतर शहा यांच्याकडे असलेली रोख रक्कम, पाकीट, मोबाईल, जॅकेट असा एकूण एक लाख 40 हजारांचा ऐवज आरोपींनी दरोडा टाकून चोरून नेला. पुढील तपास पिंपरी पोलीस करीत आहेत.