breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

‘महाईन्यूज’चे वृत्त ठरले खरे, विरोधी पक्षनेतेपदी नाना काटे यांच्या नावाची घोषणा

  • माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून सूचना प्राप्त
  • विभागीय आयुक्त कार्यालयात केली गटनोंदणी

पिंपरी, (महाईन्यूज) – राष्ट्रवादी काँग्रेसने पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या विरोधी पक्षनेते पदी विठ्ठल उर्फ नाना काटे यांच्या नावाची घोषणा केली आहे. चिंचवड विधानसभा मतदार संघातून नाना इच्छुक असून त्यांनी पक्षाकडे तिकीटाची मागणी देखील केली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भाजपच्या उमेदवाराला तगडे आव्हान देणारे नाना काटे पक्षाकडे एकमेव उमेदवार असून निवडणूकपूर्व कालावधीत पक्षाची ताकद वाढविण्यासाठी विरोधी पक्षनेते पदावर त्यांना संधी देण्यात आली आहे. याबाबत ‘महाईन्यूज’ने 23 जून रोजी सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. ते आज तंतोतंत खरे ठरले आहे.

पिपंरी-चिंचवड महापालिकेतील विरोधी पक्षनेते दत्ता साने यांचा कार्यकाळ संपल्याने त्यांनी 9 जुलै रोजी पदाचा राजीनामा दिला. त्यानंतर या पदासाठी राष्ट्रवादीत रस्सीखेच स्पर्धा लागली होती. नाना काटे यांच्यासह जावेद शेख, वैशाली घोडेकर हे देखील इच्छुक होते. यापैकी प्रबळ दावेदार म्हणून नाना काटे यांच्याकडे पाहिले जाते. त्यातच ते चिंचवड विधानसभा मतदार संघातून इच्छुक राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत. पक्षाच्या तिकीटासाठी त्यांनी पक्षाकडे अर्ज देखील केलेला आहे. त्यामुळे आगामी विधानसभा निवडणूकपूर्व कालावधीत शहरामध्ये पक्षाची ताकद निर्माण करण्यासाठी नानांना विरोधी पक्षनेते पदाची संधी दिली आहे. आज पक्षाच्या नगरसेवकांसह त्यांनी विभागीय आयुक्त कार्यालयात जाऊन गटनोंदणी केली. त्यानुसार त्यांच्या नावाची घोषणा जवळपास निश्चित मानली जात आहे.

नगरसेवक नाना काटे यांना महापालिकेच्या कामकाजाचा तगडा अनुभव आहे. शांत, संयमी परंतु, प्रसंगी आक्रमक भूमिका घेणारा कार्यकर्ता म्हणून त्यांची ओळख आहे. विशेष म्हणजे, आयटीयन्स आणि सोसायटींमध्ये राहणारा शिक्षीत मतदार हा भाजपचा हक्काचा मतदार आहे. पिंपळे सौदागर सारख्या उच्चभ्रु सोसायटीच्या प्रभागातून राष्ट्रवादीची पताका नानांनी अभिमानाने फडकवत ठेवली. त्यामुळे निश्चितच त्यांनी आयटीएन्स आणि सोसायटीमधील मतदारांची नस ओळखली आहे. त्याचा फायदा पक्षाला आगामी विधानसभा निवडणुकीत होणार आहे. त्यासाठी नाना काटे यांनी विरोधी पक्षनेतेपदाचा प्लॅटफॉर्म मिळाला आहे. याबाबत महाईन्यूजने 23 जून रोजी ‘विरोधी पक्षनेते पदी नाना काटे यांचे नाव निश्चित’ या मथळ्याखाली सविस्तर वृत्त प्रसिध्द केले होते. ते आज तंतोतंत खरे ठरले आहे.

अनुभवाचा फायदा होणार

नाना काटे यांनी आमदार लक्ष्मण जगताप यांच्या विरोधात गतवर्षी चिंचवड विधानसभा लढविली आहे. त्यामुळे त्यांच्या अनुभवाचा फायदाही पक्षाला होणार आहे. मात्र, नाना काटे यावेळी सुद्दा विधानसभा निवडणूक लढविण्यास तीव्र इच्छुक आहेत. त्यामुळे पक्षाचे कारभारी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विरोधी पक्षनेते पदाची संधी नाना काटे यांना दिली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button