breaking-newsताज्या घडामोडीपुणे

माढा लोकसभा: रणजित निंबाळकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल

मुंबई – माढा लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या उपस्थितीत निंबाळकर यांनी अर्ज दाखल केला. यावेळी आमदार प्रशात परिचारक, आमदार नारायण आबा पाटील, माजी खासदार हिंदुराव नाईक निंबाळकर, माजी खासदार रणजितसिंह मोहिते-पाटील, माजी आमदार दिलीप येळगावकर, शिवाजीराव सावंत, शहाजी बापु पाटील, शहाजी पवार, श्रीकांत देशमुख, दादासाहेब साठे, संजय कोकाटे, श्रीकांत बागल, संजय पाटील यांच्यासह भाजप- शिवसेना युतीचे पदाधिकारी उपस्थित होते.

माढा लोकसभा मतदारसंघातून भाजपने निंबाळकर यांना शुक्रवारी उमेदवारी जाहीर केली. यानंतर आज त्यांनी लागलीच अर्ज दाखल केला. रणजित निंबाळकर यांची लढत राष्ट्रवादीचे उमेदवार संजयमामा शिंदे यांच्याशी होणार आहे.

माढा लोकसभा मतदारसंघात करमाळा, माढा, सांगोला, माळशिरस, माण-खटाव आणि फलटण या सहा विधानसभा मतदारसंघाचा समावेश आहे. करमाळ्यात शिवसेनेचा, माढ्यात राष्ट्रवादीचा, सांगोल्यात शेकापचा, माळशिरसमध्ये राष्ट्रवादीचा, माण-खटावमध्ये काँग्रेसचा तर फलटणमध्ये राष्ट्रवादीचा आमदार आहे. त्यामुळे माढ्यात यंदा संजयमामा शिंदे आणि रणजित निंबाळकर यांच्यात जोरदार लढत होईल अशी अपेक्षा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button