breaking-newsताज्या घडामोडीराजकारण

काही पक्षातील आमदारांना जास्त निधी, काहींना कमी, पण त्या पक्षाचं नाव घेणार नाही : थोरात

मुंबई | काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांच्यासह 11 आमदार नगरविकास खात्याच्या निधी वाटपावरुन नाराज आहेत. यासंदर्भात “आमदारांशी बोलून त्यांचं आम्ही समाधान करु,” अशी प्रतिक्रिया महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी दिली.

“आमच्यासह मित्रपक्षांचे आमदार सुद्धा नाराज आहेत, त्यांचीही नाराज आम्ही दूर करु,” असे बाळासाहेब थोरात म्हणाले.

“राज्यात तीन पक्षांचे सरकार आहे. त्यामुळे सर्वांना समान संधी मिळाली पाहिले, ही अपेक्षा आहे. काही घटना घडल्या आहेत. ही वस्तुस्थिती आहे. त्यात सुधारणा करु, असे स्वत: मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले. यासंदर्भात आमदारांशी बोलून त्यांचं आम्ही समाधान करु. आम्ही सर्व नेते मुख्यमंत्र्यांशी बोललो, असे थोरात म्हणाले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button