breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रराजकारण

मशिदीत नमाझ अदा करण्यापूर्वी खासदार इम्तियाज जलील यांना घेतलं ताब्यात

औरंगाबाद: परवानगी नसतानाही मशिद उघडून नमाझ अदा करण्यासाठी जाणारे एमआयएमचे (MIM) खासदार इम्तियाज जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मात्र, मंदिर-मशिद प्रवेश करणार असल्याचा इशारा खासदार इम्तियाज जलील यांनी गेल्या आठवड्यात दिलेला होता. कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये तसेच खबरदारी म्हणून खासदार जलील यांना पोलिसांनी ताब्यात घेतल्याचं सूत्रांनी सांगितलेलं आहे.

खासदार इम्तियाज जलील यांनी बुधवारी शहरातील शहागंज येथील मशिदीत प्रवेश करून नमाझ अदा करणार असल्याची घोषणा केलेली होती. मात्र, पोलिसांनी त्याआधीच कारवाई करत खासदार जलील यांना ताब्यात घेतलेलं आहे. त्यामुळे शहागंज मशिद परसरात एमआयएमचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात उपस्थित आहेत. पोलिसांनीही मोठा फौजफाटा तैनात केलेला आहे. मशीद परिसरात कुणालाही प्रवेश मिळणार नाही, असे निर्देश पोलिसांनी दिलेले आहेत.

काय म्हणाले, MIM खासदार?

MIM खासदार इम्तियाज जलील यांनी सांगितलं की, आमचं आंदोलन हे प्रतिकात्मक होतं. आम्ही मशिदीत हजारोंच्या संख्येने जाणार नव्हतो. मोजक्याच लोकांना घेऊन आम्ही मशिद उघडून नमाझ अदा करणार होतो. मात्र, त्यासाठीच पोलिसांनी आम्हाला रोखलं आणि ताब्यात घेतलेलं आहे. मात्र, राज्य शासनानं धार्मिकस्थळं लवकरात लवकर उघडावीत, अशी मागणी खासदार जलील यांनी केली आहे. तसेच शहागंजमधील मशिद परिसरात एमआयएमच्या कार्यकर्त्यांनी गर्दी करू नये, असं आवाहन देखील खासदार जलील यांना केलेलं आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button