breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

मल्ल्याच्या खासगी विमानाची विक्री

मुंबई – कर्जबुडवेगिरी प्रकरणी वादाच्या भोवऱ्यात सापडलेला मद्यसम्राट विजय मल्ल्या याच्या खासगी विमानाची विक्री करण्यात आज करविभागाला यश आले. फ्लोरिडा येथील एव्हिएशन मॅनेजमेंट सेल्स कंपनीने या “ए 319′ जेट विमानाची 34.8 कोटी रुपये (5.05 दशलक्ष डॉलर)ला खरेदी केली आहे. गेल्या शुक्रवारी या विमानाची विक्री झाली. मार्च 2016 पासून या विमानाच्या विक्रीसाठी चार वेळा लिलाव ठरवण्यात आला होता. मात्र बोली लावण्यासाठी कोणी पुढे न आल्यामुळे हे प्रयत्न विफल झाले होते.

हे विमान मल्ल्या देशाबाहेर व्यवसायिक प्रवासासाठी वापरत असे. कर विभागाने किंगफिशर विमान कंपनीच्याऑक्‍टोबर 2012 पर्यंतच्या 800 कोटी रुपयांच्या थकबाकीसाठी या विमानाचा लिलाव केला होता. या विमानाच्या लिलावासाठी “ई निविदा’ मागवण्यात आल्या होत्या. कर्नाटक उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार या विमानाचा लिलाव करण्यात आला होता. त्यासाठी मुंबई विमानतळावरचे हे विमानताब्यात घेण्यात आले होते. त्यासाठी सुरुवातीला 152 कोटी रुपयांची किमान किंमत निश्‍चित केली गेली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button