breaking-newsक्रिडा

#AUSvIND : दुसऱ्या कसोटीतून अश्विन आणि रोहितला वगळले

  • दुसऱ्या कसोटीसाठी 13 सदस्यीय संघाची घोषणा

पर्थ – भारतीय संघाने पहिल्या कसोटीत ऑस्ट्रेलियाला 31 धावांनी हरवत कसोटी मालिकेची शानदार सुरूवात केली. मात्र दुसऱ्या कसोटीपूर्वी भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. कारण भारतीय संघाचा फिरकीपटू रविचंद्रन अश्विन आणि फलंदाज रोहित शर्मा हे दुखापतग्रस्त झाल्याने दुसऱ्या कसोटीत खेळू शकणार नाही. तसेच सलामीवीर पृथ्वी शाॅ ही दुखापतीतून सावरला नसल्याने  त्याचाही दुसऱ्या कसोटीसाठी संघात समावेश करण्यात आलेला नाही.

अश्विन, रोहित आणि पृथ्वी यांच्या अनुपस्थित भारतीय संघात हनुमा विहारी, रवींद्र जडेजा, उमेश यादव आणि भुवनेश्वर कुमार यांचा 13 सदस्यीय संघात समावेश करण्यात आलेला आहे.

भारतीय 13 सदस्यीय संघ पुढीलप्रमाणे – विराट कोहली (कर्णधार), मुरली विजय, केएल राहुल, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, हनुमा विहारी, ऋषभ पंत, रवींद्र जडेजा, इशांत शर्मा, मोहम्मद शमी, जसप्रीत बुमराह, भुवनेश्वर कुमार, उमेश यादव.

View image on Twitter

ICC

@ICC

India name 13-man squad for second Test – Rohit, Ashwin ruled out through injury! 🤕

Kohli (c), Vijay, Rahul, Pujara, Rahane, Vihari, Pant (wk), Jadeja, Ishant Sharma, Shami, Bumrah, Bhuvneshwar, Umesh Yadav.

Which two players will miss out on the final XI? #AUSvIND

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button