breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणेमहाराष्ट्र

‘मला काहीही बोलायचे नाही’, ‘मला माझे काम करू द्या’ – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणे – राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी नातू पार्थ पवार याना जीरपणे फटकारले होते. त्यावर पवार कुटुंबातील वाद चिघळला होता. यावर अजित पवार यांची भूमिका काय याविषयी अनेकांना उत्सुकता लागली आहे. मात्र, बारामती दौऱ्यावर असलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पार्थ पवारविषयी बोलण्यास नकार दिला आहे. मला कुणाशी काहीही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे, असं मत त्यांनी व्यक्त केलंय.

अजित पवार यांनी पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तरे दिली आहेत. तसेच मला कुणाशीही काही बोलायचं नाही. मला माझं काम करायचं आहे. मी सकाळी सकाळी या अधिकाऱ्यांना इकडे आणलंय, असं म्हणत अजित पवारांनी पार्थ पवार प्रकरणावर बोलण्याचं टाळलं.

अजित पवार सध्या बारामती दौऱ्यावर असून ते विविध विकास कामांची पाहणी करत आहेत. बारामती मतदारसंघातील विकासकामांची पाहणी करणे आणि नागरिकांच्या समस्या जाणून घेण्यासाठी अजित पवार बारामतीत आहेत. विशेष म्हणजे पार्थ पवार प्रकरणानंतर अजित पवार यांनी अद्याप कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यामुळे तर्कवितर्कांना उधाण आलं आहे.

“पार्थ पवार यांची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबाची बैठक”

पार्थ पवार याची नाराजी दूर करण्यासाठी अजित पवार यांच्या उपस्थितीत पवार कुटुंबाची बैठक झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. या बैठकीला उपमुख्यमंत्री अजित पवार, श्रीनिवास पवार, आई सुनेत्रा पवार, काकी शर्मिला पवार असे सर्वजण उपस्थित होते. या संयुक्त चर्चेत पार्थची नाराजी दूर करण्यासाठी कुटुंबियांनी प्रयत्न केले. अजित पवार यांचे धाकटे बंधु श्रीनिवास पवार यांच्या बंगल्यात ही शनिवारी (15 ऑगस्ट) रात्री ही बैठक झाली, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button