breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रविदर्भ

नागपूर हादरलं : कॉंग्रेसच्या माजी नगरसेवकाची भर चौकात कु-हाडीने हत्या

नागपूर – उपराजधानी नागपुरात गुन्हेगारीनं हाहाकार माजवला आहे. जुन्या वादातून काँग्रेसचे माजी नगरसेवक देवा उसरे यांची भरदिवसा हत्या करण्यात आली. या घटनेने नागपूरसह राज्यभरात खळबळ उडाली आहे.

नागपूरच्या भारत टाकीज जवळ आज सकाळी नऊच्या सुमारास ही घटना घडली. देवा उसरे यांच्यावर दोन अज्ञात आरोपींनी कुऱ्हाडीने वार करत हत्या केली. हत्या नेमकी कोणत्या कारणामुळे झाली, याचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसून जुन्या वादातून हत्या झाल्याची माहिती समोर आली आहे.

देवा उसरे हे  गड्डीगोदाम परिसरात राहतात. आज सकाळी उसरे चहा घेण्यासाठी घराशेजारी एका टपरीवर आले होते. त्यांनी आपली दुचाकी लावून खाली उतरले असता तेवढ्यात दोन तरुणांनी त्यांच्यावर कुऱ्हाडीने सपासप वार केले. अचानक झालेल्या या हल्ल्यात उसरे हे गंभीर जखमी झाले. रक्ताच्या थारोळ्यात ते जमिनीवर कोसळले. त्यानंतर हल्लेखोरांनी घटनास्थळावरुन पळ काढला.

स्थानिक लोकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन उसरे यांना तातडीने रुग्णालयात दाखल केले. पण, अतिरक्तस्त्राव झाल्यामुळे डॉक्टरांनी उसरे यांनी मृत घोषित केले. उसरे यांच्यामागे पत्नी, दोन मुले, दोन भाऊ असा परिवार आहे.

या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून हल्लेखोरांचा शोध घेत  आहे.

उसरे हे काँग्रेसच्या तिकिटावर दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले होते. उसरे यांनी महापालिकेच्या निवडणुकीत माजी महापौर राजेश तांबे यांना पराभूत केले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button