breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रव्यापार

व्यावसायिक सिलिंडर महागला, जाणून घ्या किती रुपयांनी वाढली किंमत

Gas cylinder : डिसेंबर महिन्यात केंद्राने व्यावसायिक सिलिंडरच्या दरात ३०.५० रुपयांची कपात केली होती. त्यानंतर जानेवारीत देखील व्यावसायिक गॅसचे दर २ रुपयांनी कमी करण्यात आले होते.

देशाचा अर्थसंकल्प  सादर होण्यापूर्वीच अतिशय महत्त्वाची बातमी समोर आली आहे. व्यावसायिक गॅस दर पुन्हा वाढले आहेत. व्यावसायिक गॅस सिलेंडर १४ रुपयांनी महागला असून, फेब्रुवारीच्या पहिल्या दिवसापासून अर्थात आजपासून हे नवे दर लागू झाले आहेत.

हेही वाचा –  आमदार रोहित पवारांची आज पुन्हा ईडी चौकशी

फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच व्यावसायिक गॅस महागला आहे. त्यामुळे आज दिल्लीत व्यावसायिक सिलिंडर १७६९.५० रुपये, कोलकातामध्ये १८८७ रुपये इतका झाला आहे.

चेन्नईत १७२३.५० रुपये तर मुंबईत व्यावसायिक सिलेंडरचा दर आता १७२३.५० रुपये इतका झाला आहे. दरम्यान, घरगुती गॅस सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणतीही दरवाढ करण्यात आलेली नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button