breaking-newsराष्ट्रिय

‘चौकीदारांचा पक्षच चोर! वेबसाईटसाठी आमचे डिझाइन चोरले’; स्टार्टअप कंपनीचा आरोप

जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणाऱ्या भारतीय जनता पक्षाची वेबसाईट हॅक झाल्यानंतर पंधरा दिवसांनी पुन्हा सुरु झाली. मात्र या नवीन वेबसाईटवरुन आता एका वादाला तोंड फुटले आहे. भाजपाच्या या नव्या अधिकृत वेबसाईटसाठी वापरण्यात आलेले वेब टेम्पलेट आपल्या मालकीचे असून कोणतीही पूर्वपरवणगी न घेता ते वापरण्यात आल्याचा दावा आंध्र प्रदेशमधील एका कंपनीने केला आहे. वेब डिझाइन क्षेत्रात काम करणाऱ्या डब्यू थ्री लेआऊट्स या कंपनीने हा आरोप केला आहे. भाजपाने आमची कोणतीही परवाणगी न घेता वेबसाईटसाठी आमचे टेम्पलेट वापरल्याचे या कंपनीने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले आहे. चोरी उघड होऊ नये म्हणून टेम्पलेटची बॅक लिंक हटवल्याचा आरोपही कंपनीने आपल्या पोस्टमध्ये केला आहे.

‘जगातील सर्वात मोठा राजकीय पक्ष असणारा भारतातील सत्ताधारी पक्ष सौजन्य न देता आमचे टेम्पलेट कसे चोरू शकतो?’, या मथळ्याखाली कंपनीने ब्लॉग प्रकाशित केला आहे. ‘आम्ही आंध्रप्रदेशमधील नेर्रोल येथील एक लहान स्टार्टअप कंपनी आहोत. आम्ही प्रिमियम दर्जाचे एटचीएमएल वेब टेम्पलेट तयार करुन ते नवीन वेबसाईट करणाऱ्यांना उपलब्ध करुन देतो. भाजपाची वेबसाईट मागील काही दिवसांपासून बंद होती. ती पुन्हा सुरु झाली. त्यातही त्यांनी आमचे टेम्पलेट वापरल्याने आम्हाला खूपच आनंद झाला. आमच्या वेबसाईटवरील टेम्पलेट कोणीही वापरू शकतो. मात्र ते वापरल्यानंतर वेबसाईटच्या शेवटी एक बॅक लिंक असते ज्यावरुन हे टेम्पलेट कोणी तयार केले आहे हे समजते. भाजपाने आपल्या साईटवरून ही बॅक लिंकच काढून टाकली आहे. भाजपाच्या आयटी सेलला आमचे काम आवडले आणि त्यांनी आमचे टॅम्पेलट वापरल्यामुळे आम्ही खूप खूष होतो. मात्र त्यांनी बॅकलिंक काढून टाकत या कामाचे श्रेय आम्हाला दिले नाही समजल्यानंतर आम्हाला धक्काच बसला. या टेम्पलेटसाठी भाजपाने आम्हाला पैसेही दिले नाहीत आणि श्रेयही दिले नाही,’ असं कंपनीने या ब्लॉगमध्ये म्हटले आहे.

W3layouts@W3layouts

@BJP4India please ask your team to read the license terms https://w3layouts.com/license/  before removing “designed by w3layouts”?
Please provide your IT Team Email id will have a word.

License – w3layouts.com

license terms and conditions for sharing w3layouts templates for bloggers and webmasters

w3layouts.com

466 people are talking about this

View image on TwitterView image on Twitter

W3layouts@W3layouts

all we wanted was a “thanks for the template”, and we would’ve given you the permission to remove the backlink… But instead, you decided to spoil the good looking webpage by removing our code. @BJP4India

215 people are talking about this

कंपनीने ट्विटवरून भाजपाला ही गोष्ट लक्षात आणून दिल्यानंतर त्यांनी कोणतीही दखल घेतली असा आरोपही या स्टार्टअप कंपनीने केला आहे. ब्लॉगच्या शेवटी ते म्हणतात, ‘आता भाजपाच्या आयटी सेलने वेबसाईटचे संपूर्ण कोडींग बदलले आहे. ज्या राष्ट्रीय पक्षाचा प्रमुख नेता स्वत:ला चौकीदार म्हणवतो तो पक्ष अशाप्रकारे दुसऱ्याचे काम कोणतेही सौजन्य न देता कसे चोरु शकतो असा प्रश्न आम्हाला पडला आहे. एका छोट्या कंपनीचे कामाची चोरी केल्यानंतर पकडले गेल्यावरही चोरी मान्य करण्याचे सौजन्यही पक्षाने दाखवले नाही,’ अशी टीका डब्यू थ्री लेआऊट्सने केली आहे.

जागतिक सुरक्षातज्ज्ञ इलियट अल्डरसन यांनीही याबाबत ट्विटरवरुन भाजपाला लाज वाटली पाहिजे असं ट्विट केलं आहे.

Elliot Alderson@fs0c131y

Hi @BJP4India,

Let me summarise:
– You have been hacked
– You didn’t have backups
– After 3 weeks of « maintenance » you used a free template from @W3layouts
– You plagiarised @W3layouts work without giving them credit

Shame on you!https://blog.w3layouts.com/why-worlds-largest-and-indias-ruling-political-party-plagiarised-our-work-without-giving-us-credit/ 

4,282 people are talking about this

नेटकऱ्यांना भाजपाची ही चोरी खटली असून अनेकांनी यासाठी त्यांनी ट्रोल केले आहे.

डिजीटल इंडिया

John Opdenakker@j_opdenakker

I created a meme…

131 people are talking about this

टेंपल आणि टेम्पलेट गोंधळ झाला असेल

Rishabh Chomsky@ChomskyRishabh

Bhakts will be confused between Temple & Template 🤔🤔🤔

148 people are talking about this

टेम्पलेट तिथेच बनवणार

RYP उपअध्यक्ष@Roflnath

Template wahi banayenge 💪💪😂

38 people are talking about this

याचही श्रेय

iScreamDada@DadaScream

As per standArd party policy, all credit goes to supreme leader😂. On another note-are websites becoming just a good to have asset?

See iScreamDada’s other Tweets

इलियट अल्डरसन यांनी याआधीही भारतातील सायबर सुरक्षेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. त्यांनी भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरण म्हणजेच ट्रायचे चेअरमन आर एस शर्मा यांची गोपनीय माहिती उघड केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button