पुणे

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या शोरूमचे अभिनेते अनिल कपूर यांच्या हस्ते झक्कास… उद्घाटन

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या उद्घाटन ऑफर म्हणून ज्या ग्राहकांनी १५ ,००० चे सोने खरेदी केले त्यांना सोन्याचे एक नाणे भेट देण्यात आले. तसेच १५,००० च्या डायमंड खरेदीवर सोन्याची दोन नाणी भेट देण्यात आली.· ग्राहकांना किंमतीतील चढउतारांपासून बचाव करण्यासाठी १०% डाऊन पेमेंट देऊन अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा पर्याय दिला गेला.

जगातील सर्वात मोठी रिटेल ज्वेलरी साखळी असलेल्या मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या शोरूमचे उद्घाटन सरसन प्लाझा, गोखले हॉलच्या विरुद्ध, लक्ष्मी रोड, पुणे येथे मलबार गोल्ड अँड डायमंड्सचे ब्रँड अ‍ॅम्बेसेडर आणि सुप्रसिद्ध अभिनेते अनिल कपूर यांच्या हस्ते झाले.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या उद्घाटन ऑफर म्हणून ज्या ग्राहकांनी १५ ,००० चे सोने खरेदी केले त्यांना सोन्याचे एक नाणे भेट देण्यात आले. तसेच १५,००० च्या डायमंड खरेदीवर सोन्याची दोन नाणी भेट देण्यात आली. ग्राहकांना किंमतीतील चढउतारांपासून बचाव करण्यासाठी १०% डाऊन पेमेंट देऊन अ‍ॅडव्हान्स बुकिंगचा पर्याय दिला गेला.

मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या या नवीन शोरूममध्ये ग्राहकांच्या आवडीनुसार दागिने ठेवलेले आहेत. आधुनिक, पारंपारिक, स्टाईलिश तसेच समकालिन डिझाइनर दागिन्यांचा मोठ्या प्रमाणात समावेश आहे. या शोरुममध्ये बीआयएस हॉलमार्क, माइन ब्रँड डायमंड्स( यामध्ये २८ वेगवेगळ्या लॅब मधून त्याची गुणवत्ता तपासली जाते आणि त्यानंतर त्यांना जीआयए, आयजीआय प्रमाणपत्र दिले जातात) एरा अनकुट डायमंड ज्वेलरी, प्रिकिया रत्न ज्वेलरी, भारतीय हेरिटेज डिझाइन, एथनिक्सच्या ब्रँड अंतर्गत हस्तकलेच्या डिझाईनर ज्वेलरी आणि मुलांसाठी स्टारलेट डिझाईन्स नवीन शोरूमचे प्रमुख आकर्षण आहे. मलाबार गोल्ड अँड डायमंड्स ज्वेलरीमध्ये ट्रेंडी डिझाइनचे लक्षवेधी संग्रह प्रदर्शित करीत आहेत.

यावेळी बोलताना अनिल कपूर म्हणाले की, मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या या नवीन शोरूममध्ये ग्राहकांच्या आवडी-निवडी लक्षात घेऊनच दागिने ठेवलेले आहेत. ज्यामध्ये वेगवेगळ्या डिझाईनचा समावेश आहे.यावेळी बोलताना मलाबार ग्रूपचे चेअरमन एम.पी. अहमद म्हणाले की, पारदर्शकता, गुणवत्ता आणि सचोटी हाच आमच्या व्यवसायाचा गाभा आहे. सर्व प्रकारच्या ग्राहकांच्या आवडीनुसार डिजाईन करण्यात आलेले दागिने यामुळे आम्हाला जागतिक मान्यता प्राप्त झाली आहे.ते पुढे म्हणाले की, आम्ही आमच्या ग्राहकांचे कृतज्ञ आहोत ज्यांनी आमच्या व्यवसायात त्यांचा विश्वास दाखवला आहे. आम्ही पुढे महाराष्ट्रात आणखी दुकाने उघडण्याचा आमचा मानस आहे. आम्ही उच्च प्रतीची उत्पादने, नवीन तंत्रज्ञान आणि प्रामाणिक व्यापाराद्वारे ग्राहकांना पैशाचे मूल्य सुनिश्चित करण्यास वचनबद्ध आहोत.जागतिक स्तरावरील सुविधा आणि उत्पादनांव्यतिरिक्त, मलाबार गोल्ड अँड डायमंड्स दागिन्यांसाठी आयुष्यभराची देखभाल, एक वर्षाचा विनामूल्य विमा, सोन्याच्या एक्सचेंजसाठी शून्य कपात आणि सर्व दागिन्यांसाठी बायबॅक गॅरंटी वाढविते. प्रत्येक उत्पादनावर त्याची किंमत, एकूण वजन, स्टोनचे वजन इ सविस्तर माहिती आहे.मलाबार गोल्ड अँड डायमंड्सच्या सध्या १० देशांमध्ये २५० हून अधिक शाखा आहेत. मलाबारला होणाऱ्या एकूण नफ्या पैकी ५% नफा ते शिक्षण, आरोग्य, महिला सबलीकरण, गरीबांच्या उद्धारासाठी आणि पर्यावरण संरक्षणा क्षेत्रातल्या कार्यांसाठी व्यतीत करतात.या प्रसंगी स्टोर हेड शाहीन परवेझ, मॅनेजिंग डायरेक्टर आशेर ओ, एग्ज़िक्युटिव डायरेक्टर अब्दुल सालेम, रिजनल हेड सुबैर एम पी, अभिनेता अनिल कपूर, एम. पी मोहम्मद, फांझीम अहमद उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button